Santosh Deshmukh Murder Case Sarkarnama
मराठवाडा

Santosh Deshmukh Murder Case : सुरेश धसांचा बीड हत्या प्रकरणात नवा सनसनाटी आरोप, 'कृष्णा आंधळे सायको, तर विष्णू चाटेने...'

Vishnu Chate mobile discard : मस्साजोगचे संतोष देशमुख यांच्या हत्येला दोन महिने उलटून गेले तरीही या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे. आंधळेला पकडण्यात पोलिसांना यश आलेलं नाही. त्यामुळे पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.

Jagdish Patil

Beed News, 09 Feb : मस्साजोगचे संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येला दोन महिने उलटून गेले तरीही या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे. आंधळेला पकडण्यात पोलिसांना यश आलेलं नाही. त्यामुळे पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.

मात्र, पोलिसांवर आपला पूर्ण विश्वास असून ते लवकरच आंधळेला पकडतील असं म्हणत भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी कृष्णा आंधळे बाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. आंधळे हा सायको किलर असून पोलिस भरतीची करत असतानाच तो गुन्हेगार झाल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

माध्यमांशी संवाद साधताना सुरेश धस म्हणाले, "संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून योग्य पद्धतीने सुरु आहे. मात्र, कृष्णा आंधळे हा पोलिसांच्या कामगिरीला लागलेला कलंक आहे. आंधळे छत्रपती संभाजीनगर येथे पोलिस भरतीची तयारी करत होता. मात्र, त्यानतंर तो गुन्हेगारीकडे वळला. तो सायको झाला होता. त्याला आपल्या आई-वडीलांशी देखील काही देणेघेणं नव्हतं."

शिवाय तो अनेक गुन्ह्यात फरार होता. आतादेखील तो राज्याबाहेर लपून बसला असेल. शिवाय तो नामचीन गुंड नाही त्यामुळे कधीतरी पकडला जाईलच. आमचा पोलिसांवर (Police) पूर्ण विश्वास असून सरपंच देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी होत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही, असंही धस म्हणाले.

तर यावेळी धसांनी वाल्मिक कराड (Walmik Karad) आणि त्याच्या सहकऱ्यांमुळे परळीतील 500 व्यापारी शहर सोडून गेल्याचा गंभीर आरोप केला. शिवाय आता कराडला अटक झाल्यामुळे व्यापाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला असून आजकाल परळीत दादागिरी चालत नाही, असंही त्यांनी सांगितलं.

चाटेने मोबाईल धरणात फेकला...

दरम्यान, धस यांनी विष्णू चाटे याच्याबाबतही मोठा दावा केला आहे. विष्णू चाटे संतोष देशमुखांच्या हत्येनंतर नाशिकमध्ये आला. यावेळी त्याने त्याचा मोबाईल बंद केला आणि गंगापूरच्या धरणात फेकून दिला. त्यानंतर तो पोलिसांना शरण गेला, असा मोठा दावा धस यांनी केला. शिवाय चाटेने मोबाईल फेकून दिला असला तरी तपासा अडथळा येणार नाही. कारण कंपनीला सांगून फेकलेल्या मोबाईलमधील सर्व डेटा रिकव्हर करता येईल, असं वक्तव्य धस यांनी केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT