Devendra Fadnavis : ठाकरे आता भाजपला नकोच; देवेंद्र फडणवीसांची खमकी भूमिका

ShivSena Uddhav Thackeray BJP CM Devendra Fadnavis Mumbai : उद्धव ठाकरे भाजपबरोबर युती करणार, अशा बातम्यांवर भाजप नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया.
Devendra Fadnavis Uddhav Thackeray
Devendra Fadnavis Uddhav Thackeray Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : विधानसभा निवडणुकीवेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जहरी टीका केली होती. 'एकतर तू राहशील किंवा मी राहीन', असे म्हणत ठाकरेंनी फडणवीस यांना अंगावर घेतले होते. फडणवीसांनी यावर 'एक है तो सैफ है', अशा घोषणा देत उत्तर दिलं.

देशात आणि राज्यात भाजप महायुतीचे सरकार आहे. देवेंद्र फडणवीस भाजप नेते होण्याबरोबर राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत. उद्धव ठाकरे यांच्याबरोबर युती होणार असल्याच्या बातम्या डोके वर काढत, असतात. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, "शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) किंवा अन्य पक्षांना भाजप आपल्याबरोबर युतीमध्ये घेणार, या वावड्या अधूनमधून उठते. त्या वावड्याच आहेत. त्यात काही तथ्य नाही. भाजप मंत्री चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरे एका कार्यक्रमात समोरासमोर आले, तर लगेच भाजप-ठाकरेंमध्ये युती होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. पण त्यात काहीच अर्थ नाही".

Devendra Fadnavis Uddhav Thackeray
Delhi AAP news : 'शीश महाल', 'मद्य प्रकरणा'मुळे 'आप'ची साफसफाई

'देशाच्या दक्षिणेकडील राज्यांमध्ये विरोधी पक्षांमधील नेते एकमेकांचे हाडवैरी असताता. पण महाराष्ट्रात तशी काही परिस्थिती नाही, हे चांगलं आहे. समारंभ किंवा कार्यक्रमांना एकत्र आल्यावर विरोधी पक्षांमधील नेत्यांच्या गाठीभेटी घेतली जातात. संवाद साधला जातो. यात कोणतीही अडचण येत नाही, हे चांगल्या राजकारणाचे आणि समाजकारणाचे लक्षण आहे', असे भाजप (BJP) नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

Devendra Fadnavis Uddhav Thackeray
Dinvishesh 9 February : काय घडलं होतं त्या वर्षी वाचा आजच्या ऐतिहासिक घटना..

ठाकरेंची भेट झाल्यावर...

उद्धव ठाकरे यांच्याशी भेट झाल्यावर आपली काय भूमिका राहील, यावर देवेंद्र फडणवीस यांनी औपचारिक बोलण्यात मला त्यांच्याशी कोणतीही अडचण नाही, असे सांगितले. पण भाजपला आता आणखी मित्रपक्ष किंवा अन्य पक्षांमधील नेत्यांची आवश्यकता नसल्याचेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

पद वाटताना अनेक प्रश्न

महायुतीमध्ये सत्तेत भाजपबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आहे. यांच्यात पद वाटताना अनेक प्रश्न असतात, अशी कबुलीही देवेंद्र फडणवीस यांनी दिली. त्यामुळे मित्रपक्षांची अधिक आवश्यकता नाही. त्यांना पदे देणे आणि सत्ता टिकवणे महत्त्वाचे आहे, असेही फडणवीस यांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com