Beed News : गेल्या जवळपास तीन महिन्यांपासून भाजप आमदार सुरेश धस यांचं नाव बीड जिल्ह्यासह राज्याच्या राजकारणात चर्चेत राहिलेलं आहे.केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येनंतर बीडमधील गुन्हेगारी घटनांबाबत एकापाठोपाठ धक्कादायक खुलासे करत राज्याचे मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्याविरोधात रान पेटवण्याचं काम धसांनी केलं. त्यात ते बऱ्यापैकी यशस्वीही ठरले.पण आता त्याच सुरेश धसांच्या (Suresh Dhas) अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण धसांविरोधात आणि मंत्री धनंजय मुंडेंच्या बचावार्थ अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा बडा नेता मादानात उतरला आहे.
भाजप आमदार सुरेश धस यांचा आष्टी मतदारसंघही सध्या चर्चेचा विषय ठरला होता.कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना आष्टीमध्ये आणून विविध विकासकामांचं भूमिपूजन करण्यात आलं होतं. याद्वारे धसांनी एकप्रकारे त्यांच्या राजकीय विरोधकांना आपली ताकदच दाखवून दिली होती. पण विधानसभा निवडणुकीतील प्रतिस्पर्धी राहिलेल्या मात्र महायुतीत एकत्र असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (NCP) बाळासाहेब आजबेंनी धसांवर गंभीर आरोप करत वातावरण तापवलं आहे. तसेच त्यांनी उपोषणाला बसणार असल्याचा इशाराही दिला आहे.
आमदार सुरेश धस यांच्या आष्टी विधानसभा मतदारसंघात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांचा नवा वाद पेटण्याची चिन्हे आहेत.राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी आमदार बाळासाहेब आजबे यांनी गुरुवारी(ता.27) पत्रकार परिषद घेत सुरेश धस यांच्यासह प्रशासनाविरोधातही लढाई छेडली असून ते आजपासूनच उपोषण सुरू करणार आहे.
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत आष्टी मतदारसंघात झालेल्या मैत्रीपूर्ण लढतीत भाजप आमदार सुरेश धस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे उमेदवार बाळासाहेब आजबे यांचा सत्तर हजारहून अधिक मतांनी पराभव केला होता.पण आता पराभवाचा धक्का विसरुन आजबे यांनी आष्टी मतदारसंघातील विकासकामांचा निधी रोखल्याचा आरोप करत त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरच बेमुदत उपोषण छेडलं आहे.
आजबे म्हणाले,मी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे.आमच्या मंत्र्यांवर जे आरोप केले जात आहेत,ते सिद्ध झाले पाहिजेत.धनंजय मुंडे दोषी असतील तर त्यांनी राजीनामा द्यावा.पण आमदार धस आणि वाल्मिक कराड यांचे गेल्या 20 वर्षांपासून संबंध आहेत.सध्या मात्र, या दोघांकडून फक्त मी मारल्यासारखं करतो, तू रडल्यासारखं कर असा प्रकार सुरु आहे.समाजातील लोकांनी याकडं लक्ष द्यायला हवं असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
तसेच सुरेश धस या माणसाचं आडमुठं धोरण आहे.मतदारसंघात त्यांचं लक्ष नाही.मीडियामुळे ते आम्हाला जड झाले आहेत.त्यांच्याकडे किती अंधार आहेत, हे पाहायला पाहिजे. ज्यांच्यावर अन्याय झाला, ती माणसं मी इथे आणली आहेत असंही माजी आमदार बाळासाहेब आजबेंनी यावेळी सांगितलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.