Vijay Vadettiwar:नाशिक पालकमंत्रिपदासाठी वडेट्टीवारांनी सुचवला महायुतीला अफलातून फॉर्म्युला

Nashik Guardian Minister News: नाशिक आणि रायगड या दोन जिल्ह्यात पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये मतभेद उफाळून आले आहे. त्यामुळे सध्या दोन्ही जिल्ह्यातील पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली आहे.
Vijay Vadettiwar
Vijay VadettiwarSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News: नाशिक जिल्ह्यात पुन्हा पालकमंत्री म्हणून भाजपचे गिरीश महाजन यांची नियुक्ती केली जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे महायुतीत पुन्हा वादविवादाला सुरुवात झाली आहे. यावरून काँग्रेसचे विधिमंडळाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी यावर अफलातून तोडगा महायुतीला सांगून बोचरी टीका केली आहे.

"पालकमंत्रीपदासाठी भांडत बसण्यापेक्षा रोटेशनपद्धतीने येथे पालकमंत्री नियुक्त करावा. एक वर्ष भाजप तर दुसऱ्या वर्षी राष्ट्रवादीने पालकमंत्रीपद घ्यावे. महाराष्ट्रात खो खो नावाचा खेळ प्रसिद्ध आहे. या खेळात एकमेकांना खो देऊन उठवले जाते. तोच खेळ भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या मंत्र्यांना शिकवावा," असा टोला वडेट्टीवार यांनी लगावला आहे.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

राज्यात नाशिक आणि रायगड या दोन जिल्ह्यात पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये मतभेद उफाळून आले आहे. त्यामुळे सध्या दोन्ही जिल्ह्यातील पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली आहे. शिवसेनेने सर्वाधिक आमदार असल्याने रायगडवर दावा केला आहे. येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती तटकरे यांची नियुक्ती केली होती.

Vijay Vadettiwar
Swargate Rape Case: स्वारगेट बलात्कार प्रकरणातील 'तो' नराधम राष्ट्रवादी आमदाराचा कार्यकर्ता? विधानसभा प्रचारात सक्रिय

नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक आमदार असताना भाजपने गिरीश महाजन यांची नियुक्ती केली होती. सध्या दोन्ही जिल्ह्यातील पालकमंत्रीपदाचा विषय मुख्यमंत्र्यांनी पेंडिंग ठेवला आहे. नाशिकमध्ये कुंभ मेळा असल्याने गिरीश महाजन यांची पालकमंत्रीपदी नियुक्ती करण्याची भाजपची इच्छा आहे. स्वतः महाजन यांनी याच कारणामुळे आपल्याला आधी नियुक्त केले होते असे सांगतिले आहे.

रायगडचा विषय केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसने आपसात बसवून सोडण्याचा सल्ला दिला असल्याचे सांगण्यात येते. मात्र पालकमंत्रीपदावरून सुरू असलेल्या वादामुळे महायुतीला विरोधकांमार्फत चांगलेच धारेवर धरल्या जात आहे.

Vijay Vadettiwar
Madhi Kanifnath Yatra: मढी ग्रामपंचायतीची 'त्या' ठरावाने डोकेदुखी वाढवली; आता मंत्री नीतेश राणेंकडे धाव

कुंभमेळ्यासाठी अडीच हजार कोटी रुपये येणार असल्याने भाजपला येथे आपला पालकमंत्री हवा असल्याचाही आरोप केला जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर भाजपच्यावतीने पुन्हा महाजन यांना पालकमंत्री करण्याच्या हालचाली सुरू असल्याने महायुतीत पुन्हा वाद उफाळून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com