Crime Sarkarnama
मराठवाडा

Beed Crime News : बीडमधील धक्कादायक घटना! माजी मंत्री सुरेश नवलेंच्या 'पीए'वर प्राणघातक हल्ला

Datta Deshmukh

Beed News : माजी मंत्री सुरेश नवले यांचे स्वीय सहायक ललित अब्बड यांच्यावर दुचाकीवरून येत दोघांनी कोयत्याने वार केले. सुदैवाने हे वार चुकवल्याने त्यांच्या हाताच्या मनगटावर जखमा झाल्या आहेत. हा धक्कादायक प्रकार बुधवारी (ता.17) रात्री 9 वाजण्याच्या सुमारास बीड शहरातील महावीर चौकात घडला.

सध्या ललित अब्बड यांच्यावर बीड (Beed) जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहे. त्याठिकाणी लोकांनी मोठी गर्दी केली होती. अब्बड यांचे पेठबीड भागातील महावीर चौकात घर आहे. बुधवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास ते घरासमोर उभे होते.

यावेळी दुचाकीवरून दोघेजण आले. अब्बड यांना काही समजण्याच्या आतच त्यांनी कोयत्याने मानेवर वार करण्याचा प्रयत्न केला. परंतु,अब्बड यांनी प्रसंगावधान दाखवत वार चुकवत हातावर घेतले. यात त्यांच्या उजव्या हाताच्या मनगटावर मोठी जखम झाली आहे. तसेच डाव्या हाताच्या मनगटावरही जखम झाली असून टाके घेण्यात आले आहेत. हल्ला केल्यानंतर हे दोघेही दुचाकीवरून पसार झाले.

हल्ल्यानंतर अब्बड यांनी आरडाओरडा केल्याने परिसरातील लोकांनी धाव घेत त्यांना तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्लेखोर हे ओळखीचे असल्याची चर्चा रूग्णालय परिसरात होती. परंतु या प्रकरणात पोलिस (Police) दफ्तरी काहीच दाखल झाले नव्हते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT