Bangar, Tarfe and Andhare Sarkarnama
मराठवाडा

Shinde vs Thackeray : शिंदेंच्या संतोष बांगरांविरोधात ठाकरेंचे संतोष टारफे रिंगणात?

Sushma Andhare : ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंच्या घोषणेने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!

Mayur Ratnaparkhe

Hingoli News : मध्य प्रदेश, छत्तीसगड विधानसभेची निवडणुक नुकतीच पार पडली आहे. तर आता राजस्थानसह अन्य राज्यातील विधानसभा आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष आहे. त्यादृष्टी सर्वच राजकीय पक्षांनी कंबरही कसली आहे. याच पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे वारेही सुरू झाल्याचे दिसत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यंदा महाराष्ट्रात प्रचंड राजकीय उलथापालथ झाली आहे. शिवसेनेत ज्याप्रमाणे दोन गट निर्माण झाले, त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचेही दोन गट पडले आहेत. अशावेळी आता आगामी निवडणुकीत अनेक ठिकाणी चुरशीच्या लढती पाहायला मिळणार आहेत.

दरम्यान मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यातील कळमनूरी मतदारसंघाबाबत आज ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मोठं विधान केलं आहे. या मतदारसंघाचे नेतृत्व शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर हे करत आहेत, तर आता त्यांना टक्कर देण्यासाठी ठाकरे गटाकडून डॉ. संतोष टारफे यांचे नाव समोर आले आहे. सुषमा अंधारे यांनी जाहीरपणे त्यांच्या नावाची घोषणा केल्याने सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत.

शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आज कळमनुरी शहरात बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात आमदार संतोष टारफे यांना विधानसभेत पाठवणार असल्याचे घोषित केले आहे.

शिवसेनेकडून विधानपरिषदेवर आमच्या पाडवी यांना पाठविण्यात आले आहे त्यांना साथ देण्यासाठी संतोष टारफे यांना विधानसभेत पाठवणार असल्याची अंधारे यांनी जाहीर कार्यक्रमात घोषणा केली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT