World Cup Final : भाजपच्या 'त्या' ट्वीटला काँग्रेसने केलं रिट्वीट ; सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल!

BJP and Congress : जाणून घ्या त्या ट्वीटमध्ये नेमकं असं काय म्हटलं आहे भाजपाने जे काँग्रेसने रिट्वीट केलं आहे.
Congress and BJP
Congress and BJP Sarkarnama
Published on
Updated on

विश्वचषकाचा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू आहे आणि भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ आमनेसामने आहेत. केवळ देशभरातीलच नाही तर जगभरातील क्रीडाप्रेमींचे या सामन्याकडे लक्ष आहे. हा सामना पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह व्हीव्हीआयपी व्यक्ती अहमदाबादेत पोहचले आहेत. तर सोशल मीडियावरही लोक विविधप्रकारे व्यक्त होत आहेत, याचा पार्श्वभूमीवर भाजपने केलेलं एक ट्वीट चक्क काँग्रेसने रिट्वीट केलं आहे. त्यामुळे यावरूनही जोरदार सुरू आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Congress and BJP
Vijay Wadettiwar News : वडेट्टीवार नरमले; ‘भुजबळांच्या भूमिकेला समर्थन नाही, काँग्रेसची भूमिका घेऊन मी पुढे जाणार’

भाजपाने भारतीय क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकावा म्हणून प्रोत्साहन देण्यासाठी ''Come on Team India, We believe in you!'' असं ट्वीट केलं. त्यावर काँग्रेसने हे ट्वीट रिट्वीट करत ''True That Jeetega India'' असं म्हटलं. काँग्रेसच्या या कृतीची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे.

केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात देशभरातील विरोधी पक्षांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या आघाडीचे नावहीा 'I.N.D.I.A' आघाडी असे ठेवण्यात आले आहे.२०२४च्या लोकसभा निवडणुकीसाठी सत्ताधाऱ्यांच्या NDA महायुतीने आणि विरोधकांच्या 'I.N.D.I.A' आघाडीने कंबर कसेलली आहे. अशावेळी क्रिकेट विश्वचषकानिमित्त का होईना भाजपाने इंडिया बद्दल केलेलं ट्वीट चांगलंच चर्चेत आलं आहे.

सोशल मीडियावरही युजर्सकडून याव ट्वीट आणि रिट्वीटवर मजेशीर प्रतिक्रिया समोर येत आहेत. काहींनी म्हटले आहे की देशासाठी दोन्ही विरोधक अखेर एकत्र आले, तर काहींनी मतभेद असले पाहिजे मनभेद नसावे. असंही म्हटले आहे.

(Edited by-Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com