Sushma Andhare and Dhananjay Munde Sarkarnama
मराठवाडा

Sushma Andhare News : ... म्हणून ठाकरे गटाच्या सुषमा अंधारेंनी मानले धनंजय मुंडेंचे आभार!

Sushma Andhare and Dhananjay Munde : एवढंच नाहीतर आपल्या सोशल मीडियावरील फेसबुक अकाऊंटवरून त्यांनी मुंडे यांचे कौतुक देखील केले आहे.

Datta Deshmukh

Sushma Andhare praised Dhananjay Munde : ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे कायम विरोधकांना फैलावर घेत असतात. मात्र आपल्या खास शैलीत आरोप आणि टीका करणाऱ्या सुषमा अंधारे यांनी राज्याचे कृषिमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे आभार मानले आहेत. एवढंच नाहीतर आपल्या सोशल मीडियावरील फेसबुक अकाऊंटवरून त्यांनी मुंडे यांचे कौतुक देखील केले आहे.

याला कारण देखील तसेच आहे. आठवड्याच्या सुरुवातीला जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले. जिल्ह्यातील 61 महसूल मंडळात अतिवृष्टी झाली. अनेक नद्यांना पूर आला. घरांमध्ये पाणी शिरले, शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. यात परळीतील अनेक भागांतील घरात नदीच्या पुराचे पाणी शिरले होते. या नुकसानीची दोन दिवसांपूर्वी सुषमा अंधारे यांनी पाहणी केली. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी देखील या नुकसानीची पाहणी केली.

पुराने नुकसान झालेल्या जवळपास 570 पेक्षा अधिक कुटुंबांना पालकमंत्री धनंजय मुंडेंनी ते अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून प्रत्येकी 10 हजार रुपयांची आर्थिक मदत रविवारी देण्याचे घोषित केल्यानंतर आता ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे(Sushma Andhare) यांनी धनंजय मुंडे यांच्या या निर्णयाचे स्वागत करत आभार मानले आहेत.

अतिवृष्टीमुळे परळी शहरातील सरस्वती नदीला आलेल्या पुरामुळे रहिमत नगर, बरकत नगर, भीमा नगर इत्यादी भागातील बऱ्याच घरांमध्ये पाणी शिरून कपडे, धान्य, भांडी आदींचे नुकसान झाले होते. त्यानंतर तिथे धनंजय मुंडे यांनी जाऊन पाहणी करत नागरिकांना दिलासा दिला होता.

आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत शासकीय नियमानुसार तहसील कार्यालयाकडून त्या बाधित कुटुंबांना प्रत्येकी 5 हजार रुपयांची मदत करण्यात येत असुन या मदतीच्या दुप्पटीने धनंजय मुंडे(Dhananjay Munde) यांनी या कुटुंबांना मदत जाहीर केली असुन, शिवसेना उपनेत्या (ठाकरे गट) सुषमा अंधारे यांनी या निर्णयाचे सोशल मीडियावर पोस्ट करत स्वागत केले आहे.

गणेशोत्सवाच्या काळात नाथ प्रतिष्ठानच्या माध्यमातून पूरबाधितांना आर्थिक मदत करत असल्याबद्दल या रचनात्मक व सकारात्मक कृतीचे अंधारे यांनी स्वागत करत धनंजय मुंडे यांच्या नाथ प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांचेही अभिनंदन व आभार मानले आहेत.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT