Mla Haribhau Bagde News, Aurangabad
Mla Haribhau Bagde News, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Marathwada : नाना पुढाकार घ्या, शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणाऱ्यांना राईट करा..

नवनाथ इधाटे

Haribhau Bagde News : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह भाजपमधील नेत्यांकडून सातत्याने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरले जात आहेत. या विरोधात राज्यभरात शिवप्रेंमीमध्ये संतापाची लाट उसळली आहे. Aurangabad ठिकठिकाणी आंदोलने होत असतांना फुलंब्री येथील छत्रपती शिवाजी महाराज व क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याची स्थापना भाजपचे आमदार हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते करण्यात आली.

यावेळी शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थिती होते. भाजप नेत्यांकडून वारंवार छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवमानाच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी हरिभाऊ बागडे (Haribhau Bagde) यांना एक आव्हान केले. नाना तुम्ही विधानसभेचे अध्यक्ष असतांना सभागृहात भल्याभल्यांना शांत करत होतात, शिस्त लावत होतात. (Bjp) आता छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशबद्ध काढणाऱ्यांनाही राईट करा, त्यासाठी पुढाकार घ्या, असे आवाहन पाटील यांनी केले.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावावर सगळेच राजकीय पक्ष मते मिळवितात आणि पद, सत्ता आल्यावर त्यांना महाराजांचाच विसर पडतो. त्यामुळे इथून पुढे छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान होणार नाही यासाठी आपण ज्येष्ठ नेते तसेच या भागाचे लोकप्रतिनिधी म्हणून पुढाकार घ्यावा. नाना तुम्ही मला तुमचा नातू समजा किंवा शिवभक्त समजा आपण पक्षाचे ज्येष्ठ नेते आहात.

मी कुठल्याही पक्षाचे नाव घेणार नाही. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबत वेळोवेळी वादग्रस्त वक्तव्य केले जात आहे. त्यामुळे शिवभक्तांची भावना तीव्र होऊ लागली आहे. आपण विधानसभेचे अध्यक्ष असताना अनेक नेत्यांना राईट केलेले आहे.

त्यामुळे यात आपण पुढाकार घेऊन इथून पुढे कोणीही महाराजांचा अवमान करणार नाही यावर लक्ष द्यावे. तुमचा स्वभाव मला माहिती आहे, परंतु शिवभक्तांच्या भावना तुम्ही सभागृहामध्ये मांडाव्यात, अशी अपेक्षा देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT