Barshi News: मराठा समाजाला जर आरक्षण दिलं नाही तर आगामी विधानसभा निवडणुकीत 288 जागेवर उमेदवार देणार असल्याची घोषणा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी केली आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे महायुतीसह महाविकास आघाडीचेही टेन्शन वाढलं आहे. एकीकडे जरांगे पाटील रोज सरकारला आव्हान देत असतानाच आता बार्शीच्या आमदारांनी एक खळबळजनक दावा केला आहे.
बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनी शुक्रवारी (ता.6)मीडियाशी संवाद साधला.यावेळी त्यांनी मनोज जरांगे पाटील आणि भाजप खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांच्याविषयी मोठा गौप्यस्फोट केला आहे. ते म्हणाले,मी माझ्या देवाची म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांची, माझ्या आई-वडिलांची शपथ घेऊन सांगतो. मी फुकलो असतो तरी उदयनराजे पडले असते हे विधान तमाम महाराष्ट्रातील मराठा बांधवांनो मनोज जरांगेंनी केलं आहे.
राऊत म्हणाले, आम्ही मराठा आरक्षणाविषयी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यासोबत बैठकीला बसलो होतो. याच बैठकीत उदयनराजांचा विषय निघाला. त्यावेळी मनोज जरांगे यांनी उदयनराजे थोडक्या मतांनी निवडून आले. मला त्यादिवशी खऱ्या अर्थाने मोठा धक्का बसल्याचेही आमदारांनी यावेळी सांगितले.
आमदार राजेंद्र राऊत म्हणाले, आपण मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगेदादांबरोबर चर्चा केली. त्यांना मुख्यमंत्री शिंदे व त्यांच्या मंत्रिमंडळाने तुम्हाला मान-सन्मान दिला आहे. आपल्या ज्या काही मागण्या आहेत? आपण त्या मला व्यवस्थितपणे सांगाव्यात. त्याचसोबत चार-पाच वकील मला जोडून द्यावेत. नेमकं काय करायचंय? ते मला आपण व्यवस्थित समजून सांगितलं तर बरं होईल,असंही बोलणं जरांगेंसोबत झालं होतं असाही दावा राऊतांनी केलं होतं.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली. त्या घटनेवरसुद्धा काही अंशी चालावं लागणार आहे.काही कोर्टकचेरी करावी लागणार आहे. मराठा-ओबीसी एक असेल तर आपण हायकोर्टात याचिका दाखल करु. डायरेक्शन मागू. त्याप्रमाणे तो प्रश्न आपण सोडवू. कितीही पैसे लागायचे ते सांगा. कोणी नाही दिले तर मी बघतो. बांधवांनो, ही माझी भाषा आहे असेही राऊत म्हणाले.
मनोज जरांगे पाटील यांनी आमदार राजेंद्र राऊत यांच्या बार्शीत घोंगडी बैठक बोलावणार असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर राजेंद्र राऊतांनी आपली बाजू मांडली आहे. ते म्हणाले, मराठा आरक्षणाच्या विषयाचं तुम्हाला नेमकं काय करायचं आहे? त्याचं उत्तर मला द्या. सगेसोयरेबाबतचा कायदा करायचा होता. त्याला हरकती आल्या होत्या. कोर्टात हे टिकलं पाहिजे असं आपण त्यांना बैठकीत सांगितलं. त्यावर तुम्हाला काय करायचंय,सगेसोयरेबाबतचा निर्णय, टिकू द्या अथवा नाही टिकू द्या असं उत्तर जरांगेंचे सहकार्यांनी दिलं
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.