MVA News : कुणीच माघार घेईना...! 27 मतदारसंघ 'मविआ'ला अडचणीत आणणार

Political News : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी राज्यातील विविध मतदारसंघात चाचपणी सुरु केली आहे. त्यासोबतच नेत्यांनी मतदारसंघात मोर्चेबांधणी देखील सुरु केली आहे.
Nana Patole, Uddhav Thackeray, Sharad Pawar
Nana Patole, Uddhav Thackeray, Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यातील विधानसभा निवडणुका तोंडावर असल्याने सर्वच पक्षात लगीनघाई सुरु आहे. महायुती व महाविकास आघाडीतील जागावाटपावर चर्चा सुरु आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी राज्यातील विविध मतदारसंघात चाचपणी सुरु केली आहे. त्यासोबतच नेत्यांनी मतदारसंघात मोर्चेबांधणी देखील सुरु केली आहे. त्यातच आता महाविकास आघाडीचे जागावाटप सुरु असताना काही जागांवरून तीन घटक पक्षात रस्सीखेच असल्याचे पहावयास मिळत आहे.

महाविकास आघाडीचा जगावाटपाचा तिढा लोकसभा निवडणुकीवेळी लवकर सुटला होता. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत जागावाटपाची चर्चा सुरु झाली आहे. हा तिढा लवकर सुटणार की नाही? याची उत्सुकता लागली आहे. 27 विधानसभा मतदारसंघावरून आघाडीतील तीन किंवा दोन पक्षांमध्ये प्रचंड खेचाखेची होण्याची शक्यता आहे. आघाडीतील काँग्रेस (Congress), उद्धव ठाकरे सेना व राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकमेकांवर दबाव टाकला जात आहे.

गेल्या काही दिवसातील वातावरण पाहता काँग्रेस पूर्णपणे इलेक्शन मोडमध्ये गेल्याचे दिसत आहे. येणाऱ्या काळात काँग्रेसची सत्ता येणार हे गृहीत धरूनच तयारी सुरु केली आहे. त्यामुळे आतापासूनच मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेसमध्ये फिल्डिंग लावणे सुरू झाले आहे. बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), नाना पटोले, विजय वडेट्टीवार, सतेज पाटील यांची नावे चर्चेत आहेत.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे सर्व नेते सोबत होते. मात्र, विधानसभा निवडणुकीत सर्वच पक्षांना मुख्यमंत्री पदाची महत्वकांक्षा सतावत आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा तिढा लोकसभा निवडणुकीत लवकर सुटला होता. त्यामुळे यावेळी तो लवकर सुटणार की नाही ? याची उत्सुकता लागली आहे. 27 विधानसभा मतदारसंघात आघाडीत रस्सीखेच आहे.

Nana Patole, Uddhav Thackeray, Sharad Pawar
Supriya Sule News : सुप्रिया सुळेंचं मोठं विधान; म्हणाल्या, 'दादा नेहमीच शिंदे गटाच्या टार्गेटवर...'

जागावाटपात दुसरीकडे उद्धव सेनेचा दबाव काँग्रेसला मान्य नाही. कोणत्याही परिस्थितीत जागावाटपात 120 च्या खाली जागा घेऊ नका, असे काँग्रेस नेतृत्वाचा त्यांच्यावर दबाव आहे. त्यातच शरद पवार सावध पावले टाकत आहेत. त्यांचा भर स्ट्राइक रेट वाढवण्यावर आहे. या उद्देशाने ते किमान 100 जागासाठी अडून बसण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे जागा 288 आहेत अन तीन पक्षाची मागणी पहिली तर साडेतीनशे आकडा आहे, हीच अवस्था युती आणि आघाडीत आहे. त्यामुळे आता येत्या काळात काय होणार ? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Nana Patole, Uddhav Thackeray, Sharad Pawar
BJP Politics : महाराष्ट्र जिंकायचाय..भाजपचं ठरलं! 'या' चार शिलेदारांवर जबाबदारी

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com