RanajagjitSinha Patil Vs Tanaji Sawant  Sarkarnama
मराठवाडा

Tanaji Sawant : 'गद्दारी यांच्या रक्तात, उंट, बेडूक...', तानाजी सावंत राणाजगजितसिंह नको नको ते बोलले

ZP Elections Sawant Vs Ranajagjitsinha : तानाजी सावंत यांनी राणाजगजितसिंह यांच्यावर जोरदार टीका करत जिल्हा परिषद निवडणुकीत टांगा पलटी घोडे फरार करण्याचा इशारा दिला.

Roshan More

Tanaji Sawant News : जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतदानासाठी अवघा एक दिवस राहिला असताना धाराशिव जिल्ह्यातील प्रचारात आरोप प्रत्यारोप करण्यात येत आहे. माजी मंत्री, आमदार तानाजी सावंत यांनी भाजपचे आमदार राणाजगजितसिंह यांच्या जोरदार टीका करताना त्यांना उंट, बेडूक म्हणत डिवचले.

ते म्हणाले, 'भाजपवाल्यांनी उंट आपल्या मंडपात घेतला. पण सत्तांतर झाल्याबरोबर धाराशिव जिल्ह्यातून दुसऱ्या मंडपात जाणारा हा पहिला उंट असेल, हे भाजपने ओळखलं पाहिजे. गद्दारी ही रक्तातच आहे. तो कुठल्याच पक्षाचा नाही. '

'महायुतीचे सरकार जाऊद्या किंवा काही अडचण निर्माण होऊद्या, नवीन समीकरणं तयार होऊद्या पहिला उडी मारणारा हा बेडूक असेल. हे तुम्हाला सांगतो. तत्व आणि नियत यांचा अभाव असणारी ही लोक आहेत. विचार हा प्रकार त्यांच्याकडे नाही.', असे म्हणत सावंतांनी राणाजगजितसिंह यांना डिवचले.

टांगा पलटी घोडे फरार...

राणाजगजितसिंह यांच्या पत्नी निवडणुकीच्या मैदानात आहेत. त्यावरून सावंत म्हणाले की, काही नेत्या मंडळींच्या सौभाग्यवती गुडघ्याला बाशिंग बांधून, देव पाण्यात घालून बसले आहेत. सगळ्यांना माहिती आहे. आम्ही पण ध्यान देऊन आहोत. यांचे 2022 ला टांगा पलटी घोडे फरार केले होते. तसे येत्या जिल्हा जिल्हा परिषदेला यांचे टांगा पलटी घोडे फरार केल्याशिवाय राहणार नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT