Ladki Bahin Yojana : ‘लाडकी बहीण’वर राजकीय डाव? महिलांची फसवणूक, गावकऱ्यांचा संताप; ठाकरेसेनेनं शिंदेसेनेला पळवलं!

Sindhudurg Election Clash: Shiv Sena UBT Stops Shinde Sena Over Ladki Bahin Yojana Row : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे शिवसेना लाडकी बहीण योजनेचे गैरवापर करत असल्याचा आरोप होत आहे.
Sindhudurg Election Clash
Sindhudurg Election ClashSarkarnama
Published on
Updated on

Sindhudurg ZP election : विधानसभा निवडणुकीत माझी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सत्तेसाठी यशस्वी ठरली. नगरपालिका आणि महापालिका निवडणुकीत देखील सत्ताधारी महायुतीकडून, या योजनेचा वापर झाला. आजही सत्ताधाऱ्यांकडून या योजनेवर भर दिला जातो. परंतु या योजनेच्या लाभार्थींना आता चाळण लावली गेली आहे. अनेकांचा लाभ वेगवेगळी नियम दाखवत थांबवला गेला आहे.

सरकारी सेवेत असलेल्या महिला कर्मचारी-अधिकाऱ्यांकडून या योजनेचा लाभ घेतला, आता त्यांच्याकडून वसुली केली जात आहे. असे असले तरी, या योजनाचा राजकीय फायदा घेण्याचा प्रकार, सत्ताधाऱ्यांकडून, विशेष करून एकनाथ शिंदे शिवसेनेकडून सुरू आहे. यावरून सिधुंदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत शिवसेना उद्धव ठाकरे सेना पक्ष आणि एकनाथ शिंदे शिवसेना आमने-सामने आले आहेत.

माझी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे (Ladki Bahin Yojana) महायुती सरकारच्या तिजोरीवर मोठा ताण आला. विधानसभा निवडणुकीनंतर योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी केली गेली. यात अनेकांना चाळणी लावली गेली. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत, पुन्हा सत्ताधारी महायुतीमधील भाजप-एकनाथ शिंदे शिवसेना-अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून लाडकी बहीण योजनेवर भर दिला जात आहे. विशेष करून, एकनाथ शिंदे शिवसेना या योजनेवर निवडणुकीत अधिक भर देताना दिसत आहे.

परंतु या योजनेमुळे ठाकरेसेना आणि शिंदेसेना (Eknath Shinde) आमने-सामने आली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत, लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरून घेण्यासाठी एकनाथ शिंदे शिवसेनेकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील, घावनळे जिल्हा परिषद मतदारसंघातील शिवापूर गावात काही महिलांना पाठवण्यात आले. या महिलांकडे विचारपूस केल्यावर, ठाकरेसेनेचे पदाधिकारी आणि गावकरी चांगलेच आक्रमक झाले. या महिला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देखील नव्हत्या. त्या वर्धा जिल्ह्यातील होत्या. त्यामुळे ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी अधिकच संताप व्यक्त केला.

Sindhudurg Election Clash
NCP Internal Politics : 'अनसिक्युअर कोण?' नीलेश लंकेंच्या एका वाक्यानं राष्ट्रवादीत संशयाचं वादळ!

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदे शिवसेनेकडून माझी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा गैरवापर करून महिलांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप ठाकरेसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी केला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील घावनळे जिल्हा परिषद मतदारसंघातील शिवापूर गावात शिंदेसेनेकडून महिलांचे लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरून घेत असल्याने, त्या महिलांना अडवून जाब विचारला. ठाकरेसेना अन् शिंदेसेना आमने-सामने आल्याने, तणावाचे वातावरण झाले होते.

Sindhudurg Election Clash
Meghalaya Coal Mine Blast: मेघालयमध्ये कोळसा खाणीत भीषण स्फोट! 18 कामगारांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं? जाणून घ्या

शिंदेसेनेच्या महिलांचा काढता पाय

निवडणुकीच्या काळातच कसे, अर्ज भरून घेण्यासाठी आले. अनेक लाभार्थ्यांना वगळले आहे. तेव्हा कुठे होतात? असे असताना पुन्हा अर्ज भरून घेण्याचे कारण काय? निवडणुकीच्या काळातच तुम्ही कसे आला? इतरवेळी का नाही येत? निवडणुकीचा प्रचार या योजनेच्या माध्यमातून केला जात आहे का? असे अनेक प्रश्न ठाकरेसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी विचारताच, शिंदेसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी तेथून काढता पाय घेतला. ठाकरेसेना अन् शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

निवडणुकीच्या काळात दिशाभूल

शिवसेना ठाकरे सेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांनी, 'लाडकी बहीण योजनेच्या नावावर फक्त मत मागण्यासाठी वापर करण्यात आल्याचा आरोप केला. या योजनेतून महिलांचा अर्ज बाद झाला, त्यांची दिशाभूल करून पुन्हा अर्ज भरून घेत जात आहे.' हा निवडणुकीतील धंदा आहे, निवडणुकीच्या काळातच सरकारी योजनेचे अर्ज कसे भरले जातात, याची चौकशी झाली पाहिजे, संबंधित महिलांचा शोध घ्यावा, अशी मागणी वैभव नाईक यांनी केली.

व्हिडिओची सत्यता तपासावी लागेल

शिंदेसेनेचे आमदार नीलेश राणे यांनी, मी काही तो व्हिडिओ बघितला नाही. त्याची सत्यता तपासावी लागेल. ठाकरेसेनेचे लोक रिकामटेकडे आहेत. त्यांनीच केला असेल, असा उद्योग. याची चौकशी झाली पाहिजे. असा कोणता प्रकार झाला असेल, तर ठाकरेंसेनेने थेट पोलिसांत तक्रार करावी, ते तक्रार का करत नाहीत, सोशल मीडियावर व्हिडिओ का फिरवता? असा सवाल केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com