Tanaji Savant Sarkarnama
मराठवाडा

Tanaji Savant : खेकडे सोडून..., तानाजी सावंतांच्या टीकेला राष्ट्रवादीचे प्रत्युत्तर

Tanaji Sawant releasing crabs on the poster : आपल्या वक्तव्यांमुळे कायम चर्चेत आणि वादात असलेले मंत्री तानाजी सावंत यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेसबाबतही ‘उलट्या’ होतात या वक्तव्याचे पडसाद आता राजकीय फडात उमटले आहेत.

Datta Deshmukh

Beed News आपल्या वक्तव्यांमुळे कायम चर्चेत आणि वादात असलेले शिवसेना मंत्री तानाजी सावंत यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेसबाबतही ‘उलट्या’ होतात या वक्तव्याचे पडसाद आता राजकीय फडात उमटले आहेत. जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या ‘महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठा’ खेकडा अशा आशयाचे पोस्टर तयार करुन त्या पोस्टरवर चक्क खेकडे सोडले.

सावंत (Tanaji Savant) यांच्या राजीनाम्याची मागणी करत राजीनामा द्या, राजीनामा द्या, खेकडा मंत्री तानाजी सावंत राजीनामा द्या, अशा घोषणा राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी केल्या. आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी ‘मी हाडामासाचा शिवसैनिक असून आयुष्यात कधीही काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी माझे जमलेले नाही. आज जरी मंत्रिमंडळात आम्ही त्यांच्या मांडीला मांडी लावून बसत असलो तरी बाहेर आल्यानंतर उलट्या होतात, हे सहन होत नाही’, असे वक्तव्य केले.

या वक्तव्याचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटले आहेत. बीडच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनीही या वक्तव्याच्या निषेधार्थ शहरातील बिंदुसरा नदीवर असणाऱ्या दगडी पूलावर आंदोलन केले. जिल्हा उपाध्यक्ष अविनाश नाईकवाडे, युवती आघाडीच्या प्रिया डोईफोडे यांनी आंदोलन करताना सावंत यांच्याबाबत अनेक आरोप केले. आम्हाला यांच्यासोबत नको, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घ्यावा, राज्यात सर्वत्र स्वतंत्र लढण्याची ताकद राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असून अशा खेकडा मंत्र्यांसोबत नको असे असे नाईकवाडे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT