Mahayuti News : तानाजी सावंतांनंतर आता भाजपचा प्रवक्ता; दादांवर तोंडसुख, रूपाली पाटलांचाही पारा चढला !

Political News : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सर्वच राजकीय पक्ष लागल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच महायुतीमध्ये सर्व काही अलबेल नसल्याचे चित्र सध्या समोर येत आहे.
Ajit pawar Tanaji Savant
Ajit pawar Tanaji SavantSarkarnama
Published on
Updated on

Pune News : लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला अपेक्षित यश मिळाले नाही. यानंतर सातत्याने याचा खापर अजित पवार यांच्यावर फोडण्याचा प्रयत्न महायुतीतील खालच्या फळीतील नेत्यांकडून करण्यात येत असल्याचे पाहायला मिळते. महायुतीतील वरिष्ठ नेते जरी महायुतीमध्ये सगळं काही अलबेल असल्याचे सांगत असले तरी सातत्याने महायुतीतील अंतर्गत कुरघोड्या समोर येत आहेत.

आता नव्याने भाजप प्रवक्ते असलेले गणेश हाके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर तोंडसुख घेतले. त्यांच्या विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रूपाली ठोंबरे पाटील यांचा देखील आवाज वाढल्याचे पाहायला मिळाले. (Mahayuti News)

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सर्वच राजकीय पक्ष लागल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच महायुतीमध्ये सर्व काही अलबेल नसल्याचे चित्र सध्या समोर येत आहे. शिवसेना शिंदे गट आणि भाजपतील काही नेते अजित पवारांवर तोंडसुख घेत आहेत, त्यामुळे अजित पवार महायुतीला जड झालेत का? असा प्रश्न निर्माण होत आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या साप्ताहिकामधून अजित पवारांना सोबत घेतल्याने लोकसभा निवडणुकीत फटका बसल्याचे वक्तव्य समोर आले होते. त्यानंतर भाजपचे सहयोगी असलेले सदाभाऊ खोत यांनी देखील अजित पवारांवर वक्तव्य करत अजित पवारांचे युतीत राहणं त्यांना रुचलेले नसल्याचे सांगितले होते.

शिवसेना शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत (Tanaji Sawnat) यांनी अजित पवार यांच्यासोबत जरी कॅबिनेटमध्ये मांडीला मांडी लावून बसत असलो तरी बाहेर आल्यानंतर उलट्या होतात. हे सहन होत नाही', असे धक्कादायक विधान केले होत.

Ajit pawar Tanaji Savant
Ajit Pawar NCP : अजितदादांचं विधानसभेचं जागावाटप ठरलं! 54 फिक्स तर टार्गेट 'इतक्या' जागांचं

यानंतर आता भाजप प्रवक्ते गणेश हाके यांनी अजित पवारांवर तोंडसुख घेतले आहे. हाके म्हणाले, 'भाजपच्या खासदाराचा पराभव राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या आमदारामुळे झाला आहे. त्यामुळं अजित पवार गटाबरोबर झालेली युती दुर्देवी आहे. खरे म्हणजे ती युती ना त्यांना पटली ना आम्हाला पटली. असंगशी संग म्हणतात असा संग आमच्यासोबत घडवला आहे,' असं विधान हाके यांनी केला आहे.

यावर रुपाली ठोंबरे पाटील यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे, यापूर्वी देखील तानाजी सावंत, सदाभाऊ खोत यांनी अजित पवारांसंदर्भात वक्तव्य केली होती. त्यावर शिवसेना शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई यांनी सावंत यांचं हे त्यांचे वैयक्तिक वक्तव्य असून त्याचा पक्षाची कोणताही संबंध नसल्याचे सांगितले. आता भाजप प्रवक्ते गणेश हाके यांनी देखील एक विधान केले आहे. अशा प्रकारच्या विधान करण्याचा हक्क कोणी दिला, असा सवाल ठोंबरे पाटील यांनी उपस्थित केला.

Ajit pawar Tanaji Savant
Ajit Pawar News : दादांनी दिला बहिणींना पाच वर्षांचा वादा

अजित पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी विचारविनिमय करून युती केली आहे. त्यामुळे खालच्या पातळीचे कोणतेही नेते येऊन आपल्या स्वार्थासाठी बरळत असतील तर त्यांच्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता नाही. गणेश हाके, तानाजी सावंत यांच्यासारख्या मंडळी स्वतःच्या स्वार्थासाठी निवडणूक काळामध्ये बरळत असतात, त्यांना आमच्या वतीने शून्य किंमत असल्याचे रूपाली ठोंबरे पाटील म्हणाल्या.

Ajit pawar Tanaji Savant
NCP Sharad Pawar : तुतारी वाजवायची इच्छा; पक्षाच्या तिजोरीत टाका 10 हजारांचा निधी

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com