Marathwada Teacher Constituency News, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Marathwada Teacher Constituency : प्रदीप सोळुंके यांचाही अर्ज दाखल, बंडखोरी की राष्ट्रवादीची रणनिती ?

Ncp : उमेदवारी मिळाली नाही, तरी आपण निवडणूक लढणार, असेही त्यांनी जाहीर केले होते.

सरकारनामा ब्युरो

Aurangabad : नेत्याचा मुलगाच आमदार, मंत्री कशाला? मी देखील गेली कित्येक वर्ष पक्षात इमाने-इतबारे काम करत आहे. पक्षाने आता भाकरी फिरवावी, असे म्हणत (Marathwada) मराठवाडा शिक्षक मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या उमेदवारीवर दावा सांगणारे वक्ता सेलचे अध्यक्ष प्रदीप सोळुंके यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

त्यामुळे राष्ट्रवादीकडून बंडखोरी झाली? की मग हा पक्षाच्या रणनितीचा एक भाग आहे? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. मराठवाडा शिक्षक मतदारसंघातून महाविकास आघाडीने (Ncp) राष्ट्रवादीच्या विक्रम काळे यांना उमेदवारी दिली. सलग चौथ्यांदा ते निवडणूक रिंगणात उतरले आहेत. (Ajit Pawar)अजित पवार यांच्यासह शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा उपस्थितीत आज काळे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

त्यापाठोपाठ राष्ट्रवादीच्याच प्रदीप सोळुंके यांनी देखील आपला अर्ज दाखल केला. सोळुंके यांनी काळेंच्या उमेदवारी विरोध दर्शवत आपल्याला उमेदवारी मिळावी अशी मागणी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे केली होती. पक्षाने आता भाकरी फिरवली पाहिजे, विक्रम काळे यांच्याबद्दल नाराजी आहे. त्यामुळे मला उमेदवारी द्या, मला द्यायची नसेल तर दुसऱ्या कुणाला द्या, पण परत विक्रम काळे नको, अशी जाहीर भूमिका सोळुंके यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना घेतली होती.

तसेच उमेदवारी मिळाली नाही, तरी आपण निवडणूक लढणार, असेही त्यांनी जाहीर केले होते. आज त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे राष्ट्रवादीत बंडखोरी झाली का? अशी चर्चा सुरू झाली आहे. परंतु हा राष्ट्रवादीच्या रणनितीचाच एक भाग असू शकतो. तांत्रिक कारणाने प्रमुख उमेदवाराचा अर्ज बाद झाला, तर त्याच पक्षातील इतर दुसऱ्या उमेदवाराचा अर्ज राहावा, हा यामागे हेतू असतो.

अनेक राजकीय पक्ष असे करतात, त्यामुळे तुर्तास राष्ट्रवादीत बंडखोरी असे म्हणता येणार नाही. उमेदवारी अर्जांची छाननी आणि त्यानंतर माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी काय घडते? सोळुंके अर्ज माघारी घेतात? की कायम ठेवतात यावर बरेच अवलंबून असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT