Marathwada Teacher Constituency News, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Marathwada Teacher Constituency Result : बंडखोर सोळुंके, कुलकर्णी यांना पक्षाने आणि मतदारांनीही जागा दाखवली..

Aurangabad : प्रदीप सोळुंके यांनी तुम्हाला ब्रेकींग न्यूज द्यावी, लागेल असा निकाल लागणार असल्याचा दावा केला होता.

सरकारनामा ब्युरो

Aurangabad : औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीचे विक्रम काळे आणि भाजपच्या किरण पाटील यांच्याविरोधात बंडखोरी झाली होती. अनुक्रमे प्रदीप सोळुंके (pradip Solunke) आणि नितीन कुलकर्णी यांनी निवडणूक लढवली. बंडखोरांचा पक्षाच्या उमेदवारांना फटका बसतो की काय? असे वाटत होते, मात्र बंडखोरी केल्यामुळे पक्षाने आणि मतदारांनी देखील त्यांना जागा दाखवून दिल्याचे स्पष्ट झाले आहे.

पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये राष्ट्रवादीचे बंडखोर प्रदीप सोळुंके यांना फक्त ४३५ तर नितीन कुलकर्णी यांना केवळ १२५ मते मिळाली आहेत. (Ncp) त्यामुळे हे दोघेही बंडोबा थंडोबा निघाले. प्रदीप सोळुंके यांनी मतमोजणी सुरू होण्यापुर्वी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया देतांना तुम्हाला ब्रेकींग न्यूज द्यावी, लागेल असा निकाल लागणार असल्याचा दावा केला होता. (Bjp) परंतु तो फोल ठरला आहे, भाजपच्या नितीन कुलकर्णी यांची गत तर सोळुंके यांच्यापेक्षा वाईट झाली.

या शिवाय प्रहारने पाठिंबा दिलेल्या संजय तायडे यांना देखील पहिल्या पसंतीची फक्त ५९१ मते मिळाली आहेत. त्यामुळे शिक्षक मतदारांनी महाविकास आघाडी-भाजप आणि मराठवाडा शिक्षक संघाचे सुर्यकांत विश्वासराव यांच्यावरच विश्वास व्यक्त केल्याचे पहिल्या पंसतीच्या मतांवरून स्पष्ट झाले आहे.

भाजपच्या किरण पाटील यांच्यासाठी मात्र तिसऱ्या क्रमांकावर जाणे जास्त धक्कादायक म्हणावे लागेल. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पंकजा मुंडे, प्रितम मुंडे यांनी किरण पाटील यांच्यासाठी प्रचारसभा घेतल्या होत्या. तरी देखील ते पहिल्या पसंतीत तिसऱ्या क्रमांकावर राहिले, त्यामुळे भाजपला हा मोठा धक्का समजला जातो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT