Marathwada Teacher Constituency Result : कोटा ठरला, विजयासाठी २५ हजार ३८६ मतांची गरज ; काळे `विक्रम` करणार..

Marathwada : सुर्यकांत विश्वासराव यांनी भाजप उमेदवाराला मागे टाकत चमकदार कामगिरी केली.
Marathwada Teacher Constituency News, Aurangabad
Marathwada Teacher Constituency News, AurangabadSarkarnama
Published on
Updated on

Aurangabad : मराठवाडा शिक्षक मतदार संघ निवडणुकीत पहिल्या पंसतीच्या मतांमध्ये विक्रम काळे सहा हजार ५८९ मतांची आघाडी घेतली. पहिल्या पसंतीची मतमोजणी पुर्ण झाली असून विजयासाठीचा २५ हजार ३८६ मतांचा कोटा ठरवण्यात आला आहे. पहिल्या पसंतीचा कोटा पुर्ण न झाल्याने दुसऱ्या पसंतीची मते मोजली जातील, त्यानंतरच निकाल जाहीर केला जाईल. एकूणच विक्रम काळे (Vikram Kale) चौथ्यांदा विजयी होण्याच्या मार्गावर आहेत.

Marathwada Teacher Constituency News, Aurangabad
MVA News: सुधाकर अडबाले विजयाच्या उंबरठ्यावर, भाजपसाठी धोक्याची घंटा?

विक्रम काळे यांना पहिल्या पसंतीची २० हजार ७८ मते मिळाली आहेत. तर किरण पाटील यांना १३ हजार ४८९ मते मिळाली. (Marathwada) मराठवाडा शिक्षक संघाचे सूर्यकांत विश्वासराव यांनी देखील १३ हजार ५४३ मते मिळवत प्रमुख उमेदवारांना धक्का दिला आहे. (Teacher) त्यांनी भाजप उमेदवारापेक्षा ५४ पहिल्या पसंतीची मते अधिक घेतली आहे. तर या निवडणुकीत दोन हजार ४८५ मते बाद झाली आहेत.

अपेक्षे प्रमाणे महाविकास आघाडीचे विक्रम काळे भाजपच्या किरण पाटील यांच्यापेक्षा साडेसहा हजार मतांनी आघाडीवर आहेत. तर मराठावाडा शिक्षक संघाचे उमेदवार सुर्यकांत विश्वासराव यांनी भाजप उमेदवाराला मागे टाकत चमकदार कामगिरी केली. पहिल्या पसंतीची तब्बल १३ हजार मते मिळवत चुरस निर्माण केली आहे. त्यामुळे महाविका आघाडीचे विक्रम काळे विरुद्ध भाजपचे किरण पाटील असे चित्र मतदानापुर्वी आणि नंतर देखील रंगवले जात होते.

मात्र त्यात मोठा ट्विस्ट आला आहे. प्रचारात फारसे न दिसलेले सुर्यकांत विश्वासराव यांना मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर मतदान घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपने पुर्ण शक्तीपणाला लावून देखील किरण पाटील मात्र तिसऱ्या क्रमांकावर राहिले. राष्ट्रवादीकडून बंडखोरी केलेले प्रदीप सोळुंके, भाजपचे नितीन कुलकर्णी हे पुर्णपणे निष्प्रभ ठरले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com