Teacher SIR Duty Row: Sarpanch Mangesh Sable Arrested Sarkarnama
मराठवाडा

Teacher SIR Duty: शिक्षक SIRच्या कामांवर, मग शिकवणार कोण? तहसीलदारांना जाब विचारणाऱ्या सरपंचाला अटक

Teacher SIR Duty Row: Sarpanch Mangesh Sable Arrested: शिक्षकांना SIR आणि BLO ड्युटी दिल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप करत तहसीलदारांना जाब विचारणारे फुलब्रीचे सरपंच मंगेश साबळे यांना अटक करण्यात आली. नेमके काय घडले ते जाणून घ्या.

Mangesh Mahale

Teacher SIR Duty Row: सध्या सुरु असलेल्या मतदार यादीसारख्या निवडणूक प्रक्रियेतील विविध कामांमुळे जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा मुद्दा उपस्थित करत सरपंच मंगेश साबळे यांनी तहसीलदारांना जाब विचारला.

छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयात साबळे यांना शिक्षकांच्या निवडणूक यादीचे कामावरुन सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा येथील सरपंच मंगेश साबळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धुमाकूळ घातला. 

शिक्षकांना निवडणुकीची कामे दिली तर विद्यार्थ्यांना शिकवणार कोण? असा प्रश्न त्यांनी फुलंब्रीच्या तहसीलदार योगिता खटावकर यांना विचारला. त्यांनी प्रशासनाला धारेवर धरलं.

पोलिसांच्या मध्यस्थीनंतर सरपंच मंगेश साबळे यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात नेण्यात आले. तेथे निवेदन देताना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी आक्रमक शब्दांत संवाद साधल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जिल्हाधिकारी यांचा एकेरी शब्दात उल्लेख करीत आत्मदहनाचा इशारा त्यांनी दिला. साबळे यांना अटक करण्यात आली.

जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन जाब विचारणारे सरपंच मंगेश साबळे यांची भूमिका लक्षवेधी ठरली आहे. हा प्रश्न केवळ शिक्षकांचा नाही; तो विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या हक्काचा आणि पालकांच्या चिंतेचाही आहे.

गावोगावी सरपंच, शाळा व्यवस्थापन समिती (SMC) सदस्य आणि पालक यांनीही तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाऊन एका शाळेतील बहुसंख्य शिक्षकांना अशा कामांवर नियुक्त करण्यामागील नियोजनाबाबत प्रश्न विचारावेत आणि शिक्षणावर होणारा प्रतिकूल परिणाम मांडावा, अशी शिक्षकांकडून विचारणा होत आहे.

शिक्षकांना वारंवार अध्यापनाबाहेरील कामांमध्ये गुंतवले जाते; मात्र त्याचा सर्वाधिक फटका विद्यार्थ्यांना बसतो. म्हणून या विषयावर मंगेश साबळे यांनी आवाज उठवला आहे.

शिक्षकांना गैर-शैक्षणिक आणि निवडणुकीशी संबंधित कामे ( SIR - Special Intensive Revision आणि BLO ड्यूटी) देण्याच्या निर्णयामुळे राज्यातील शिक्षण व्यवस्थेवर मोठा ताण येत आहे. या अशैक्षणिक कामांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून, शिक्षक संघटनांनी याविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला आहे.

थोडक्यात बातमी काय आहे?

  1. फुलब्रीचे सरपंच मंगेश साबळे यांनी शिक्षकांना SIR व BLO ड्युटी देऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप करत तहसीलदारांना जाब विचारला.

  2. छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरकारविरोधात घोषणाबाजी व आंदोलन केल्यानंतर प्रशासनाने मंगेश साबळे यांना अटक केली.

  3. शिक्षकांना वारंवार अशैक्षणिक व निवडणुकीची कामे दिल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT