Telangana Assembly Elections  Sarkarnama
मराठवाडा

Telangana Assembly Elections : मुधोळची मोहीम आमदार राजेश पवारांकडून फत्ते, रामराव पाटलांची निर्णायक आघाडी

Nanded Political News : नांदेड जिल्ह्याच्या सीमा तेलंगणा राज्याला लागून असल्याने दोन्ही राज्यांतील नागरिकांचा संपर्क एकमेकांशी असतो.

Laxmikant Mule

Nanded News : तेलंगणा राज्याच्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाची परिस्थिती गेल्या निवडणुकीपेक्षा सुधारली आहे. या निवडणूकीत बीआरएसची सत्ता वापसी अवघड झाली असून या पक्षाचे संख्याबळ कमी करण्यासाठी भारतीय जनता पक्षाची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. ज्या मुधळ विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार रामराव पाटील यांनी विजयश्री खेचून आणली आहे.

या मतदारसंघाची जबाबदारी नायगावचे आमदार राजेश पवार (Rajesh Pawar) यांच्या सोपविण्यात आली होती. ‌तेलंगणा राज्याची सीमा नांदेड जिल्ह्याला लागून असल्याने सीमावर्ती भागातील विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी भारतीय जनता पक्षाच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांवर टाकण्यात आली होती.

नायगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पवार यांच्यावर मुधोळ विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी टाकली होती. ही जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पार पडली आहे.

नांदेड जिल्ह्याच्या सीमा तेलंगणा राज्याला लागून असल्याने दोन्ही राज्यांतील नागरिकांचा संपर्क एकमेकांशी असतो.तसेच मराठी व तेलगु या दोन्ही भाषा या भागातील नागरिकांना बोलता येतात.त्यामुळे कांग्रेस व भारतीय जनता पक्षाच्या (BJP) नेत्यांनी नांदेड जिल्ह्यातील आमदार व पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपविण्यात आली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नायगाव विधानसभेचे राजेश पवार यांच्यावर पक्षाने मुधोळ विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी टाकली होती. या मतदारसंघाला लागुन धर्माबाद, नायगाव हे तालुके आहेत. या जागेवर विद्यमान आमदार हा बीआरएस (BRS) चा असल्याने ही जागा भाजपासठी अवघड मानली जात होती. मुधळ हा नायगाव विधानसभेच्या निकटचा परिसर असल्यामुळे आमदार राजेश पवार यांचा या भागात चांगला जनसंपर्क असल्याने त्यांना प्रचार करण्यासाठी सोपे गेले.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT