Padamsinh Patil, Late. Pawanraje Nimbalkar Sarkarnama
मराठवाडा

Terana Sugar Scam : पवनराजे निंबाळकर, पद्मसिंह पाटील 21 वर्षांनंतर निर्दोष; काय आहे तेरणा साखर घोटाळा ?

Sunil Balasaheb Dhumal

Dharashiv Political News : धाराशिवमधील ढोकीतील तेरणा साखर कारखान्याचा साखर घोटाळा राज्यभर गाजला होता. या प्रकरणात तत्कालीन चेअरमन दिवंगत पवनराजे निंबाळकर, डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यासह 16 जणांवर प्रमुख आरोप होता. त्यांची आता धाराशिव न्यायालयाने निर्दोष सुटका केलेली आहे. तब्बल 21 वर्षांनंतर लागलेल्या या निकालाची जिल्ह्यात जोरदार चर्चा आहे.

तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्यातील साखर घोटाळ्याप्रकरणी 2002 मध्ये सीआयडीने तपास केला होता. त्यानंतर सीआयडीने कारखान्याच्या 16 पदाधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली होत. या प्रकरणाचा निकाल लागला असून, तेरणा कारखान्याचे तत्कालीन संबंधित पदाधिकाऱ्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे.

'यांची' झाली निर्दोष मुक्तता

तेरणा साखर घोटाळ्यात आरोपी असलेल्या डॉ. पद्मसिंह बाजीराव पाटील, पवनराजे निंबाळकर, रामेश्वर कारवा, शिवदास होनमाने, तानाजी शेंडगे, विवेक कुलकर्णी, राधेश्याम सोमाणी, मुकेश ओसवाल, ललित ओसवाल, अशोक शिनगारे, पवनकुमार झा उर्फ शर्मा, राजीव पाठक, मुकुंद पाठक, प्रमोद दिवेकर, मंगल बाळासाहेब पाटील, अब्दुल रशीद काझी यांची धाराशिव न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान पवनराजे यांचा मृत्यू झाला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काय होते प्रकरण ?

तेरणा साखर कारखान्याने 2001 मध्ये साखर विक्रीची जाहिरात दिली होती. त्यात मुंबई येथील रिगल इनपेक्स यांच्या निविदेला संचालक मंडळाने मान्यता दिली. त्यानंतर मात्र कोलकत्ता येथील साखर व्यापाऱ्यांना फ्रीसेलची साखर देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. निवेदेनुसार साखर विक्री न करता चुकीच्या पद्धतीने साखर विक्रीतून संबंधितांनी 48 लाखांचा फायदाच करून घेतला, तर कारखान्याला सुमारे 95 लाखांचा तोटा झाला होता. या प्रकरणी दाखल तक्रारीनुसार जीवनावश्यक वस्तू कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केला होता.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT