Terna Sugar Factory Sarkarnama
मराठवाडा

Terna Sugar Factory : तानाजी सावंतांची अमित देशमुखांना धोबीपछाड : ‘तेरणा’चा ताबा अखेर भैरवनाथ शुगरकडे!

गेली १२ वर्षांपासून बंद असलेला कारखाना भैरवनाथ शुगरकडे आल्याने यापुढील काळात एकदाही साखर कारखान्याला कुलूप लावले जाणार नाही.

राजेंद्र पाटील

ढोकी (जि. उस्मानाबाद) : गेली १२ वर्षांपासून बंद असलेला तेरणा (Terna) सहकारी साखर कारखाना (Sugar Factory) भैरवनाथ शुगरकडे आल्याने यापुढील काळात एकदाही साखर कारखान्याला कुलूप लावले जाणार नाही. भैरवनाथची पाच युनिट ज्याप्रमाणे चालवली जातात त्याचप्रमाणे या भागातील शेतकरी त्यांच्या मुलांना हाताला काम, व्यापारी, दुकानदार आदीचे हित जोपासले जाईल अशी ग्वाही सोमवारी (ता. २ जानेवारी) प्रा. शिवाजीराव सावंत यांनी दिली. (Terna Sugar Factory under the control of Tanaji Sawant's Bhairavanath Sugar)

तेरणा सहकारी साखर कारखान्यासाठी आरोग्य मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) आणि माजी मंत्री अमित देशमुख (Amit Deshmukh) यांच्यात न्यायालयातीन लढाई सुरू होती. त्याचा निकाल सावंत यांच्या बाजूने लागला. त्यानंतर आज तेरणा कारखाना सावंत यांच्या भैरवनाथ शुगरकडे रितसर वर्ग करण्यात आला. त्यामुळे न्यायालयीन लढाईतही सावंत यांनी देशमुखांवर बाजी मारली आहे.

तेरणाचा ताबा घेतल्यानंतर ऊसउत्पादक शेतकरी व कार्यकर्त्यांना ते मार्गदर्शन करत होते.भैरवनाथ शुगर व्हॉइस चेअरमन अनिल सावंत, माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती धनंजय सावंत जिल्हा बँकेचे संचालक केशव सावंत भैरवनाथ शुगरचा सर्व स्टाफ बाळासाहेब उद्धव ठाकरे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष सूरज महाराज साळुंखे, तालुकाध्यक्ष अजित लाकाळ गुणवंत देशमुख, माणिक काका वाकुरे, दत्ता तिवारी, अरुण डोलारे, ढोकीचे पोलिस पाटील राहुल वाकुरे, जिल्हा बँकेचे एमडी विजय गोणसे, विनोद लावंड आदी उपस्थित होते

तेरणाचा ताबा घेणार या पार्श्वभूमीवर ढोकी व परिसरातील चार पाच हजार शेतकरी, कर्मचारी रोहित चिंतक मंडळी या ठिकाणी आल्याने उस्मानाबादचे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलिस अधीक्षक जी रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली ढोकी पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक जगदीश राऊत यांनी दंगल प्रतिरोधक दल व ढोकी पोलिस स्टेशनचे सर्व कर्मचारी मिळून तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

तेरणा साखर कारखाना व ट्वेंटीवन शुगर लातूर यांच्या वादातील न्यायालयीन निर्णय भैरवनाथ शुगरच्या बाजूने लागला आहे. त्याचा रीतसर पंचनामा करून तेरणा साखर कारखाना सोमवारी भैरवनाथ शुगरकडे वर्ग करण्याची प्रक्रिया आज दिवसभर कारखाना कार्यस्थळावर पार पडली.

तेरणा साखर कारखाना गेल्या १२ वर्षांपासून बंद होता. आज सकाळी दहा वाजता जिल्हा मध्यवर्ती बँकेचे एमडी घोनसे पाटील तसेच प्राधिकृत अधिकारी विनोद लावंड व त्यांचा सर्व स्टाफ कारखाना स्थळी दाखल झाला. त्यानंतर भैरवनाथ शुगरचे चेअरमन प्राध्यापक शिवाजीराव सावंत, धनंजय सावंत, केशवराव सावंत व भैरवनाथ शुगरची सर्व मंडळी या ठिकाणी दाखल झाली. त्यांचे ढोकीकरांच्या वतीने स्वागत करण्यात आले. त्यानंतर कामगार थकबाकीपोटी तेरणा कारखान्याला कामगारांच्या देय असलेल्या रकमेपोटी फंड कार्यालय सोलापूर यांचे सील होते. फंडचे अधिकारी प्रतीक यांनी कारखाना स्थळी येऊन रितसर पंचनामा करून सील काढून विविध ऑफिसला लावलेली कुलुप काढून रीतसर ताबा जिल्हा बँकेकडे दिला. जिल्हा बँकेने आहे त्या परिस्थितीचा ताबा भैरवनाथ शुगरचे चेअरमन प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांच्याकडे दिला.

यावेळी बाळासाहेबांच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सूरज महाराज साळुंखे यांनीही आपले विचार व्यक्त केले. तसेच ढोकीतील मान्यवरांनी आपले विचार मांडले. आज दिवसभर ताबा घेण्याची प्रक्रिया चालू होती. तेरणा साखर कारखाना लवकरच चालू होत असल्याने सभासद शेतकरी कर्मचाऱ्यांमध्ये नऊ चैतन्य पसरले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT