Nanded Hospital Sarkarnama
मराठवाडा

Nanded Hospital Death Case : २४ रुग्ण कसे दगावले ? शासकीय रुग्णालयाच्या 'डीन'नेच सांगितलं कारण

Nanded Hospital News : नांदेड जिल्ह्यातील शंकरराव चव्हाण शासकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात २४ तासांत २४ रुग्णांच्या मृत्यूने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

अनुराधा धावडे

Nanded News : नांदेड जिल्ह्यातील शंकरराव चव्हाण शासकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात २४ तासांत २४ रुग्णांच्या मृत्यूने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे यात १२ नवजात बालकांचाही समावेश असल्याने रुग्णांच्या नातेवाइकांमध्येही संतापाचे वातावरण आहे. औषधांच्या तुटवड्यांमुळे रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाइकांकडून केला जात आहे.

नांदेडमधील विष्णुपुरी परिसरात डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात काल २४ तासांत २४ रुग्ण दगावले. यात सहा मुले, सहा मुली, सात स्त्रिया आणि पाच पुरुष रुग्णांचा मृत्यू झाला. मृत रुग्णांमध्ये सर्पदंश झालेले आणि विषप्राशन केलेले तसेच इतर आजारांचेही रुग्ण होते. त्यांच्या मृत्यूने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

मात्र, रुग्णालयाचे अधिष्ठाता (डीन) डॉ. एस. आर. वाकोडे आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय मनुरकर यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी यावर भाष्य केलं आहे. (24 dead in Nanded hospital)

अधिष्ठाता (डीन) डॉ. श्यामराव वाकोडे यांनी “गंभीर व्याधींमुळे मृत्यू झाल्याचा दावा केला आहे. तसेच, २४ तास डॉक्टरांनी त्यांना सेवा दिली. कोणत्याही प्रकारची कमतरता भासू दिली नाही, पण त्यांना असलेले आजार असे होते की, उपचार करूनही ते वाचू शकले नाहीत. आपल्याकडे दररोज दहा ते सोळा गंभीर आजार असलेले रुग्ण रुग्णालयात दाखल होतात; पण पूर्णपणे उपचार करूनही त्यांचा मृत्यू होतो.

पंरतु, यात निष्काळजीपणा, औषधांचा तुटवडा अशी कारणे अजिबात नाहीत. गंभीर अवस्थेत रुग्ण रुग्णालयात येतात, त्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जातात; पण गंभीर आजाराने त्यांचा मृत्यू झाला. आपल्याकडे अत्यावश्यक रुग्णांसाठी जी औषधे असतात ती लोकल स्तरावर खरेदी केली जातात," अशी माहिती रुग्णालयाचे अधिष्ठाता यांनी दिली.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT