Police Raid Journalists : दिल्लीत अनेक पत्रकार-लेखकांच्या घरी पोलिसांची धाड; ३० पेक्षा अधिक ठिकाणी छापेमारी !

Delhi Police Action On News Agency : विदेशी फंडिंगचा आरोप...
Police Raid Journalists :
Police Raid Journalists :Sarkarnama
Published on
Updated on

Delhi News : विदेशी फंडिंगच्या आरोपांचा ठपका ठेवत दिल्लीतल्या एका वृतसंस्थेवर आज सकाळी (दि.३ ऑक्टोबर) दिल्ली पोलिसांनी कारवाई केली आहे. या संस्थेशी संबंधित अनेक पत्रकार-लेखकांची पोलिसांनी चौकशी केल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे आता एकच खळबळ माजली आहे. (Latest Marathi News)

Police Raid Journalists :
Ambedkar on Congress-NCP : साखरपुडा झाला; पण ‘ते’ दोन ‘भटजी’ अडथळे आणत आहेत, त्यामुळे प्रसंगी विनालग्नाचे राहू; पण...

आज सकाळी दिल्ली पोलिसांनी दिल्लीतील अनेक पत्रकारांच्या घरांवर छापे टाकले. न्यूज पोर्टलला काम करण्यासाठी चीनकडून निधी मिळत असल्याच्या कथित आरोपाच्या अनुषंगाने चौकशी केली जात आहे. दिल्लीशिवाय नोएडा आणि गाझियाबादमध्येही पोलिसांकडून ३० हून अधिक ठिकाणी शोधमोहीम सुरू आहे.

Police Raid Journalists :
Tembhu Water Issue : ना राष्ट्रवादी ना भाजप, शिंदे गटानेच मारली बाजी; टेंभू पाणी योजनेला अखेर मंजुरी

लॅपटॉप जप्त -

एका मराठी वृत्तवाहिच्या माहितीनुसार, पोलिसांनी तपासादरम्यान अनेक डिजिटल पुरावेही जप्त केले आहेत. यामध्ये लॅपटॉप, मोबाईल फोन आणि हार्ड डिस्कचाही समावेश आहे. विशेष पथकासोबतच दिल्ली पोलिसांच्या स्थानिक शाखांकडून छापेमारी सुरू आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com