Dharashiv NCP News  Sarkarnama
मराठवाडा

Dharashiv NCP News : राष्ट्रवादी नामशेष, राहुल मोटे तग धरणार का ?

Maharashtra : राष्ट्रवादीची स्थिती बिकट असुन यापुढे कार्यकर्ता जोडुन काम करणारा नेता पक्षाला शोधावा लागणार.

सरकारनामा ब्युरो

Marathwada : अजित पवार यांच्या बंडाने जिल्ह्याची राष्ट्रवादी काँग्रेस भुईसपाट झाल्याचे चित्र आहे. एकटे राहुल मोटे यांच्यामुळे काही प्रमाणात शिल्लक राहिलेली शक्ती कधी गळुन पडेल याचीही शाश्वती आता देता यणार नाही. (Dharashiv NCP News) जिल्ह्याचे भुमिपुत्र समजले जाणारे शिक्षक आमदार विक्रम काळे व पदवीधर आमदार सतिश चव्हाण यांनी अजित पवार यांच्यासोबत जाणे पसंत केले आहे. त्यामुळे आता राहुल मोटे शिवाय एकही दिग्गज नेता जिल्ह्याच्या राष्ट्रवादीत शिल्लक नाही.

त्यांचीही आर्थिक नाडी अजित पवारांच्या हातात असल्याने त्यांनाही जास्तकाळ शरद पवार यांच्यासोबत राहणे परवडणारे नाही. (Dharashiv) जिल्ह्यामध्ये राणाजगजितसिंह पाटील यांच्या पक्षांतरावेळीच जिल्ह्यातील राष्ट्रवादीची घडी विस्कटली होती. बोटावर मोजण्याइतक्या नेत्यांची संख्या असली तरी त्यांच्याकडे जनाधार नसल्याचे चित्र आहे. (NCP) जनाधार असलेले एकमेव नेते म्हणुन राहुल मोटे यांच्याकडे पाहिले जाते, मात्र तिथेही राजकीय पेच आहे.

हा पेच सोडविण्यात अजित पवार यशस्वी ठरल्यास मोटे यांनाही शरद पवार याची साथ सोडावी लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे. (Marathwada) मराठवाड्याच्या मतदारसंघात विधान परिषदेवर जाणाऱ्या दोन्हीही आमदारांनी थेट अजित पवार यांच्या साथीने बंडात सहभाग घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादीचा सफायाच झाल्याचे दिसते आहे. जोवर राहुल मोटे भुमिका घेणार नाही तोवर त्या भागात पक्षाचे अस्तित्व राहणार असुन बाकी ठिकाणी पक्ष नामशेष झाला आहे.

जिल्ह्यातील विधानसभेच्या चार मतदारसंघाचा विचार केला तर उमरगा भागातुन येणारे पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांचाही कल अजित पवार यांच्याकडे असणार आहे. तुळजापुर भागात असलेले पण मध्यंतरी पक्षापासुन काहीसे अलिप्त राहिलेले अशोक जगदाळे आता कोणत्या गटात असणार याविषयी संभ्रम दिसत आहे. राष्ट्रवादी युवती प्रदेशाध्यक्ष असलेल्या सक्षणा सलगर या सुप्रिया सुळेंच्या समर्थक आहेत. त्यामुळे त्या शरद पवार यांच्यासोबत आहेत, सक्षणा सध्या तरुण असुन त्याना जनाधार मिळण्यासाठी अजुन काही काळ प्रतिक्षा करावी लागणार आहे.

बाकी नेत्यांची शिरगणती भरपुर होईल पण ज्यांच्यावर नेतृत्वाची जबाबदारी द्यावी, असा चेहरा मात्र जिल्ह्यात सध्यातरी मोटेंचा अपवाद वगळता शिल्लक राहिलेला नाही. धाराशिव कळंब मतदारसंघात पक्षाची शक्ती अतिशय नगण्य असुन मतदार असला तरी नेता नाही अशी स्थिती आहे. संजय निंबाळकर व संजय दुधगावकर ही मंडळी असली तरी त्यांच्या नेतृत्वाला मर्यादा आहेत. त्यामुळे जिल्ह्यात राष्ट्रवादीची स्थिती अतिशय बिकट असुन यापुढे कार्यकर्ता जोडुन काम करणारा नेता पक्षाला शोधावा लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT