Beed Ncp News : शरद पवार दैवत होते, पण सत्तेमुळे ओढ अजित पवारांकडे..

Ncp : माजी मंत्री आमदार प्रकाश सोळंके यांनी लवकरच भूमिका स्पष्ट करु असे सांगीतले आहे.
Ncp President Sharad Pawar News, Beed
Ncp President Sharad Pawar News, BeedSarkarnama
Published on
Updated on

Marathwada : बीड जिल्हा हा शरद पवारांच्या विचारांना माणणारा असल्याचे अनेक निवडणुकांमधून सिद्ध झाले आहे. पवारांच्या एस. काँग्रेसचे त्या काळी जिल्ह्यातील सातही आमदार विजयी झाले होते. (Beed Ncp News) पुढेही राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर पवारांच्या विचारांना कायम जिल्ह्याने साथ दिली. मात्र, आता अजित पवार सत्तेत गेल्यानंतर `पवारच आपले दैवत` म्हणणाऱ्या बहुतांशी नेत्यांचा मुड हा सत्तेच्या बाजूने असल्याचे दिसते.

Ncp President Sharad Pawar News, Beed
Hingoli Ncp News : अजितदादांनी फोन करून बोलावून घेतले, तरी आमदार नवघरे शरद पवारांसोबत

अपवाद आमदार संदीप क्षीरसागर ठरले आहेत. त्यांनी आपली भूमिका शरद पवारांच्या बाजूने असल्याचे जाहीर केले. (Beed News) बीड जिल्हा आणि शरद पवार हे समिकरण १९७५ पासूनचे आहे. (Sharad Pawar) शरद पवारांनी काँग्रेसमधून बाहेर पडून एस. काँग्रेसची स्थापना केली आणि जिल्ह्यात सातही (त्यावेळी बीड जिल्ह्यात सात विधानसभा मतदार संघ होते) आमदार शरद पवारांच्या विचाराचे म्हणजे एस. काँग्रेसचे विजयी झाले. पुढेही पवारांनी ज्या ज्या वेळी साद घातली तेव्हा जिल्ह्याने त्यांना प्रतिसाद दिला.

अगदी त्यांच्या म्हणण्याने तत्कालिन उपमुख्यमंत्री सुंदरराव सोळंके यांचा दिवंगत गोविंदराव डक यांच्याकडून पराभव देखील झाला. पुढे (Ncp)राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतरही जिल्ह्याने पवारांच्या विचारांना पाठींबा दिला. त्या काळी जिल्ह्यातील मातब्बर राजकीय घराणे राष्ट्रवादीत आले. जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस कायम ताकदीचा पक्ष राहीला. परंतु, या काळात सत्तेत असलेल्या अजित पवार यांच्या समर्थकांची संख्याही वाढली. दोघांकडूनही बळ मिळत असल्याने अनेक राजकीय नेत्यांना ताकद मिळाली.

काहीना मंडळे, काहींना परिषदाही मिळाल्या. मात्र, बहुतेकांच्या घोषणा मात्र `पवार आपले दैवत` अशाच होत्या. मात्र, आता मोठ्या पवारांना दैवत म्हणणाऱ्या मंडळींचे सत्तेतल्या अजित पवारांच्या पारड्यात वजन अधिक असल्याचे दिसते. आपले दैवत शरद पवार म्हणणाऱ्या धनंजय मुंडे यांनी पहिल्याच टप्प्यात अजित पवारांसोबत मंत्रीपद घेतले आहे. उर्वरित राष्ट्रवादीच्या तिन आमदारांपैकी संदीप क्षीरसागर यांनी मात्र आपण शरद पवारांसोबतच असल्याचे स्पष्ट केले आहे.

तर, माजी मंत्री आमदार प्रकाश सोळंके यांनी लवकरच भूमिका स्पष्ट करु असे सांगीतले आहे. विशेष म्हणजे या घडमोडीच्या दिवशीच प्रकाश सोळंके यांना मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षपदाची माळ पुन्हा एकदा मोठ्या पवारांच्या मध्यस्थीनेच पडल्याची सुत्रांची माहिती आहे. विविध कारणांनी ते देखील सत्तेसोबतच जाऊ शकतील, असा अंदाज आहे. आमदार बाळासाहेब आजबे यांनीही अद्याप आपली निष्ठा कोणाकडे हे स्पष्ट केलेले नाही.

Ncp President Sharad Pawar News, Beed
Ambadas Danve On Sanjay Shirsat : अजित पवार सरकारमध्ये, आता मिंधे गट सत्तेतून कधी बाहेर पडणार ?

माजी आमदार आणि राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित देखील सत्तेतल्या अजित पवारांसोबतच जाऊ शकतात, असा अंदाज आहे. त्यांच्या जयभवानी कारखान्याला केंद्र सरकारकडून मदत मिळावी यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असल्याने त्यांचाही कल सत्तेसोबतच असू शकतो. पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲड. राजेश्वर चव्हाणांना देखील शरद पवारांऐवजी अजित पवारांचा मार्ग निवडावा लागण्याची शक्यता आहे. कारण, त्यांच्याकडे अंबाजोगाई बाजार समितीचे सभापतीपद असून ते मंत्री धनंजय मुंडे यांच्यामुळे मिळालेले आहे.

इतर बहुतेक नेत्यांचा कल देखील सत्तेतल्या पवारांकडेच आहे. एकूणच आजपर्यंत शरद पवार दैवत होते पण आता `सत्ताकारण` महत्वाचे असल्याने निष्ठा अजित पवारांच्या बाजूने अधिक असल्याचे जिल्ह्यातील चित्र आहे. माजी आमदार उषा दराडे यांनी मोठ्या पवारांना साथ जाहीर केली असून राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष नरेंद्र काळे देखील मोठ्या पवारांच्याच गोटात राहणार आहेत. युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष महेबुब देखील मोठ्या पवारांच्याच बाजूने उभारले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com