IAS Sachin Ombase sarkarnama
मराठवाडा

Usmanabad : जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला हा धाडसी निर्णय; Whatsapp, e-mail ID केला सार्वजनिक

उस्मानाबाद Usmanabad जिल्हाधिकारी collector कार्यालयातील कोणत्याही विभागात भ्रष्टाचार corruption होतोय हे लोकांकडून समजणार आहे.

रूपेश कदम

दहिवडी : सर्वच शासकीय कार्यालयात सर्वाधिक भ्रष्टाचार होत असतो. त्याला आळा घालण्यासाठी उस्मानाबादचे जिल्हाधिकारी तथा माणचे सुपूत्र सचिन ओंबासे यांनी स्वतःचा व्हॉटसअॅपनंबर व ई- मेल आयडी सार्वजनिक केला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील कोणत्याही कामाबद्दल कोणीही शासकीय 'फी' व्यतिरिक्त पैसे मागत असल्यास तत्काळ या क्रमांकावर व ईमेल आयडीवर माहिती द्यावी, असे आवाहन केले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या या धाडसी निर्णयाचे मात्र, सर्वस्तरातून स्वागत होत आहे.

सचिन ओंबासे यांनी नुकताच उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला आहे. त्यांनी लगेचच जिल्हाधिकारी कार्यालयात प्रलंबित असणा-या प्रकरणात नियमानुसार पात्र आढळणारी प्रकरणे तात्काळ निकाली काढण्याचा निर्णय घेतला. तसेच यात भ्रष्टाचार होवू नये यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील कोणत्याही कामासाठी शासकीय कर्मचारी, एजंट, खाजगी व्यक्ती यांनी पैशाची मागणी केल्यास सदरबाब निदर्शनास आणून देण्याचे आवाहन केले आहे.

त्यांनी जिल्हाधिकारी व निवासी उपजिल्हाधिकारी यांचे व्हॅटसअॅप नंबर व वैयक्तिक ई-मेल आयडी सार्वजनिक केले असून यावर माहिती देण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील कोणत्याही विभागात भ्रष्टाचार होतोय हे लोकांकडून समजणार आहे. असा प्रकार जिल्हाधिकाऱ्यांच्या तातडीने निदर्शनास येणार आहे. जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांच्या या धाडसी निर्णयाचे मात्र, सर्वस्तरातून स्वागत होत आहे.

"कोणत्याही व्यक्तीला जिल्हाधिकारी कार्यालयातील कोणत्याही कामाबद्दल कोणीही शासकीय फी व्यतिरिक्त पैसे मागितल्यास तत्काळ मला माहिती द्यावी. माहिती देणाऱ्या व्यक्तींची नावे उघड करण्यात येणार नाहीत. तसेच ती उघड होणार नाहीत याबाबत खबरदारी घेण्यात येईल."

- सचिन ओंबासे (जिल्हाधिकारी उस्मानाबाद)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT