Satara : शेतकऱ्यांकडे दूर्लक्ष नको.. अन्यथा, हातात वाडगं घेऊन बसावे लागेल... उदयनराजे भडकले

शेतकऱ्यांकडे Farmers Question दुर्लक्ष केल्यास देशाचे तुकडे व्हायला वेळ लागणार नाही. सोमालिया Somaliya सारखी अवस्था आपल्या देशाची our Country व्हायला वेळ लागणार नाही, असे उदयनराजे Udayanraje Bhosale म्हणाले.
MP Udayanraje Bhosale
MP Udayanraje Bhosalesarkarnama
Published on
Updated on

सातारा : शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दूर्लक्ष केले जर आपल्या देशाचे तुकडे व्हायला वेळ लागणार नाही. आज आपण खूर्चीत बसतोय. पण, उद्या वाडगं घेऊन बसावे लागेल, असा इशारा भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी राज्यकर्त्यांना दिला. भाषण करतानाच उदयनराजेंनी अचानक व्यासपीठावरून खाली उतरत पाऱ्यावर येऊन मांडी घातली. शेतकऱ्यांच्या व्यथा मांडताना त्यांनी आगपाखड केली.

सातारा शहरातील जिल्हा परिषदेच्या मैदानावर छत्रपती कृषी औद्योगिक महोत्सवाचे उद्‌घाटन कृषीतज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांच्या प्रमुख उपस्थितीत व खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते झाले. देशातील शेतकऱ्यांच्या व्यथा मांडताना उदयनराजेंनी आगपाखड केली. भाषण करतानाच अचानक त्यांनी व्यासपीठावरून खाली पाऱ्यावर येत मांडी घातली.

MP Udayanraje Bhosale
ऐतिहासिक राजवाड्याचा रूबाब कायम राहण्यासाठी तो आमच्या ताब्यात द्या... उदयनराजे

ते म्हणाले, आज आपण खूर्चीत बसतोय, उद्या हातात वाडगं घेऊन बसावे लागेल. ज्या वेळेस लोक स्वतःच्या हातात सत्ता घेतील आणि म्हणतील लोकप्रतिनिधी व प्रशासनाला ओळखत नाही. अशी परिस्थिती देशाची होऊ देऊ नका. हे सर्व देशवासियांच्या हातात आहे. आपण जास्त छातीठोकपणे सांगतो. सर्वात मोठी लोकशाही असलेला आपला देश आहे. या देशात सर्व जाती, धर्माचे लोक राहतात. पण या देशाचे तुकडे व्हायला वेळ लागणार नाही.

MP Udayanraje Bhosale
Satara : शिवेंद्रसिंहराजे माझे मुख्य प्रचारक... उदयनराजेंची खोचक टीका

शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केल्यास देशाचे तुकडे व्हायला वेळ लागणार नाही. सोमालिया सारखी अवस्था आपल्या देशाची व्हायला वेळ लागणार नाही. आज आपण खूर्चीत बसतोय. पण, उद्या वाडगं घेऊन बसणार का, आपल्या भावी पिढीची काय अवस्था करायची आहे. तुम्हाला प्रगतीचा मार्ग कळायला पाहिजे. तुम्ही सुज्ञ आहात. अनेक लोक म्हणतात काहीतरी स्वार्थ असतात म्हणून करतात. माझाही स्वार्थ आहे, तो म्हणजे तुमचे कल्याण झाले पाहिजे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com