उस्मानाबाद : कळंब तालुक्यातील चोरखळीच्या धाराशिव शुगरसह अन्य चार ठिकाणी पडलेल्या आयकर धाडीत काहीच सापडले नाही, असा दावा कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी केला आहे. (Osmanabad) गुरुवारी पहाटे पाच वाजता डीव्हीपी ग्रुपचे प्रमुख अभिजीत पाटील यांच्या ताब्यात असलेल्या पाच साखर कारखाने (Incom tax Raid) व अन्य ठिकाणी आयकर विभागाच्या वीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी धाडी टाकुन तीन दिवस चौकशी व पाहणी केली.
यात आयकर विभागास अवैध पैसा, सोने असे काहीच हाती लागले नाही. जी कागदपत्र उपलब्ध होती त्यांची आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. (Marathwada) जी कागदपत्र उपलब्ध नव्हती ती देण्यास पंधरा दिवसाचा वेळ मिळाला असल्याचेही पाटील यांनी सांगितले. विरोधकांचे हे षडयंत्र होते. पण चौकशीतून काहीच हाती न लागल्याने विरोधकांचा डाव उधळला गेला.
चोराखळी कळंब येथील धाराशिव शुगर शिवाय नाशिक, नांदेड, सांगोला, बीड येथे पाटील यांनी साखर कारखाने घेतले आहेत, पैकी तीन भाडेतत्वावर आहेत. मागिल दोन महिन्यापुर्वी पंढरपुर येथील विठ्ठल सहकारी साखर कारखाना विरोधकांना धुळ चारत पाटील यांच्या ताब्यात आला होता.
माझी प्रगती पहावली जात नसल्याने विरोधकांनी षडयंत्र रचून मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचा हा डाव फसला असल्याचेही पाटील यांनी सांगितले. कारण ज्या संशयावरून आयकरची कार्यवाही झाली त्यात गैरमार्ग कुठेही केला नव्हता. जे कारखाने घेतले ते कर्ज काढुन घेतले, त्या कर्जाची नियमीत परतफेड सुरु आहे. धाडीत कुठेही अवैध पैसा, सोने सापडले नाही, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.