MP Sanjay Jadhav on Eknath Shinde :  Sarkarnama
मराठवाडा

MP Sanjay Jadhav on Eknath Shinde : "शिंदे गटातल्या नेत्यांचे आजही फोन, भेटायचं म्हणतात.." ; ठाकरेंचे खासदार जाधव म्हणाले..

MP Sanjay Jadhav on Eknath Shinde : "काही ना काही कारण सांगून सगळ्यांनी वेगळी चूल मांडली..."

सरकारनामा ब्यूरो

Parbhani News : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि ठाकरेंचे एकनिष्ठ शिलेदार, परभणी लोकसभेचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव (Sanjay Bandu Jadhav) यांनी यंदाही पंढरपूरच्या वारी केली आहे. या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) विराजमान व्हावेत, असं साकडं त्यांनी पांडुरंगाच्या चरणी साकडं घातलं आहे. वारी दरम्यान त्यांनी आपल्या जुन्या सहकारी आणि आताच्या शिंदे गटातल्या नेत्यांवरही भाष्य केलं आहे.

वारीदरम्यान खासदार जाधव यांना प्रश्न विचारला गेला की, "ज्या शिवसेनेतल्या सहकाऱ्यासोबंत तुम्ही पस्तीस-चाळीस वर्षे काम केलं. ते आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे गेलेत. त्यांच्याशी एवढ्यात काही चर्चा झाली का? त्यांचे फोन वगैर येतात का? खाजगीत काय गप्पा होतात?

या प्रश्नावर उत्तर देताना जाधव म्हणाले, "जुन्या सहकाऱ्यांचे फोन येतात, मित्रत्व आहे. आम्ही अनेक वर्षे एकत्र काम केलं. एकनाथ शिंदे आणि मी एकत्र २००४ ला आमदार झालो. संजय राठोड, दादा भुसे, गुलाबराव पाटील असतील. आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील राहिलेले आहेत. कालच (दि.२४ जून) फलटणला असताना संदिपान भुमरेंचा मला फोन आला होता. ते मला म्हणतात या आम्हाला भेटायचं आहे, असा खुलासा जाधव यांनी केला.

"पक्ष सोडून गेलेल्यांच्या मनात एक अपराधीपणाची भावना आहे. पण सगळ्या देशाने पाहिलंच आहे की, नेमकी काय उलाढाल झाली. गेलेले सगळे वेगवेगळी कारण सांगतात. आमची कामं होत नव्हती. पण सगळ्यांना माहिती आहे की, हे ४० लोक कशामुळे तिकडे गेले. ईडी, सीबीआयच्या भीतीने काही गेले. कुणी खोक्याच्या आमिषाने गेले, कुणी मंत्रीपदाच्या आमिषाने गेले, काही ना काही कारण सांगून सगळ्यांनी वेगळी चूल मांडली," असा थेट वार त्यांनी शिंदे गटातल्या नेत्यांवर केला.

"यांनी मागे वळून पाहिलं असतं, आपण कोण होतो, याचं भान जरी राखलं असतं तर चुकीची पावलं पडली नसती. पण आम्ही सत्तेच्या इतके आहारी गेलो आहोत की, आम्हाला पुढेच पळायची सवय लागली आहे. मागे वळून पाहायला आम्ही तयार नाही. आपल्यासोबतचे सामान्य शिवसैनिक, सामान्य कार्यकर्ते, ज्यांच्यामुळे आपण घडलो, त्यांना काहीच मिळालं नाही, पण तुम्हाला इतकं सारं मिळूनही तुम्ही गेलात," असेही खासदार संजय जाधव म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT