लातूर येथील जवाहर नवोदय विद्यालयात सहावीत शिकणाऱ्या अनुष्का पाटोळेचा मृतदेह हॉस्टेलमध्ये आढळला.
पालकांनी व्यक्त केलेल्या संशयाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने SIT नेमण्याचा निर्णय घेतला.
नांदेडच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहा सदस्यीय पथक तपास करणार आहे.
Latur Crime News : लातूरमधील जवाहर नवोदय विद्यालयात सहावीत शिकणाऱ्या अनुष्का पाटोळे या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर राज्यभर खळबळ उडाली होती. तर सहावीत शिकणारी अनुष्का वसतिगृहातील खोलीत गळफास घेतल्याचे अवस्थेत आढळली होती. यानंतर हा अपघात होता की तिने अभ्यासाच्या तणावातून आत्महत्या केली अशी प्रश्न उपस्थित केले गेले. तर या प्रश्नांचा उलगडा करण्यासाठी पोलिस तपास करत होते. याचदरम्यान राज्य सरकारने मोठं पाऊल उचललं असून विशेष तपास पथक (SIT) नेमली आहे.
लातूरच्या जवाहर नवोदय विद्यालयाच्या वसतिगृहातील खोलीत सहावीत शिकणारी अनुष्का पाटोळे ही विद्यार्थिनी खोलीत गळफास घेतल्याचे अवस्थेत आढळली होती. ज्यानंतर अनुष्काने अभ्यासाच्या ताणातून जीवन संपवले असल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. पण अनुष्का अभ्यासात हुशार आणि सर्वाच चुणचुणीत विद्यार्थिनी होती, असे सांगितले जाते.
तर हा प्रकार उघडकीस आल्यानंतर अनुष्काच्या आईसह नातेवाइकांनी विद्यालयात गर्दी करत नेमका हा प्रकार कशातून झाला? अशी विचारणा विद्यालयातील प्रशासकीय व्यवस्थेकडे केली होती. पण विद्यालयाच्या प्रशासनाकडून कोणतेच उत्तर मिळत नव्हते. तर कोणताही खुलासा होत नसल्याने संभ्रम वाढला.
अशातच आता या प्रकरणात राज्य सरकारने मोठं पाऊल उचललं असून SIT ची स्थापना केली आहे. पालकांनी व्यक्त केलेल्या संशयानंतर हे पाऊल उचलण्यात आले असून नांदेड येथील अतिरिक्त पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही SIT नेमण्यात आली आहे. या पथकात सहा सदस्य असून ते या प्रकरणाचा सखोल तपास करणार आहेत. याची माहिती लातूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत अर्चना पाटील यांनी दिली.
यावेळी त्यांनी, जरी प्राथमिक तपासात आणि शवविच्छेदन अहवालात काही गोष्टी स्पष्ट झाल्या असल्या, तरी पालकांनी उपस्थित केलेले शंकाकुशंक आणि समाजात असलेला असंतोष पाहता, प्रत्येक बाजूने चौकशी केली जाणार आहे. यामध्ये रॅगिंग किंवा घातपाताचा कोणताही कोन दुर्लक्षित केला जाणार नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
अनुष्काच्या मृत्यूनंतर परिसरात तीव्र पडसाद उमटले होते. तर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करत अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. तर या प्रकरणात विद्यालयातील कर्मचारी पल्लवी सचिन कणसे आणि लता दगडू गायकवाड यांना अटक केली होती. यानंतर आता राज्य सरकारने एसआयटीची स्थापना केली आहे. आता या प्रकरणात एसआयटी कोणता उलगडा करते हे लवकरच समोर येईल.
1) अनुष्का पाटोळे कोण होती?
अनुष्का पाटोळे ही लातूर येथील जवाहर नवोदय विद्यालयात सहावी इयत्तेत शिकणारी विद्यार्थिनी होती.
2) घटना कुठे घडली?
ही घटना लातूरमधील जवाहर नवोदय विद्यालयाच्या हॉस्टेलमध्ये घडली.
3) सरकारने SIT का नेमली?
पालकांनी मृत्यूबाबत संशय व्यक्त केल्याने आणि पारदर्शक तपासासाठी SIT नेमण्यात आली.
4) SIT चे नेतृत्व कोण करत आहे?
नांदेडच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक अर्चना पाटील SIT चे नेतृत्व करत आहेत.
5) तपासातून काय निष्पन्न होण्याची शक्यता आहे?
मृत्यू आत्महत्या आहे की इतर काही कारण, याबाबत सत्य बाहेर येण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.