Latur Mahanagarpalika Result : लातूरची महापालिका भाजपने गमावली, रवींद्र चव्हाणांचं वक्तव्य भोवलं : विलासरावांच्या आठवणीत काँग्रेसचा दणदणीत विजय

Latur Municipal Election News : भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील असे वादग्रस्त विधान केले होते. याचा फटका भाजपला बसल्याचे दिसते आहे.
Sambhaji Patil Nilangekar On Amit Deshmukh
Sambhaji Patil Nilangekar On Amit DeshmukhSarkarnama
Published on
Updated on

Latur News : लातूर महापालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाने मोठी आघाडी घेतली आहे. सुरुवातीच्या कलात काँग्रेस व भाजपमध्ये चुरस दिसत होती. मात्र, आता काँग्रेस पक्षाने ३७ तर वंचित बहुजन आघाडीने सर्व पाच जागांवर आघाडी घेतली आहे. भाजपसाठी हा धक्का असून काँग्रेस-वंचित आघाडीने बहुमताच्या दिशेने वाटचाल केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील असे वादग्रस्त विधान केले होते. याचा फटका भाजपला बसल्याचे दिसते आहे.

लातूर महापालिकेत शुक्रवारी सकाळी मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर भाजप आणि काँग्रेस पक्षामध्ये रस्सीखेच सुरू होती. त्यानंतर आता काँग्रेसने येथे मुसंडी मारली आहे. याठिकाणी १६ जागांवर काँग्रेसने आघाडी घेतली होती. तर भाजप व वंचित बहुजन आघाडी ३ जागांवर आघाडीवर घेतली असल्याचे चित्र होते.

Sambhaji Patil Nilangekar On Amit Deshmukh
BJP 100 Plus Seats : मुंबईत भाजपला '100 प्लस'? मोहित कंबोजचा दावा; ठाकरेंच्या शिलेदाराचा ‘क्रोनॉलॉजी’वर घणाघात!

दुपारनंतर मात्र याठिकाणचे चित्र बदलले असून काँग्रेस पक्षाने 37 तर वंचित बहुजन आघाडीने सर्व पाच जागांवर आघाडी घेतली आहे. भाजपसाठी हा धक्का असून काँग्रेस-वंचित आघाडीने बहुमताच्या दिशेने वाटचाल केली आहे. या ठिकाणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचं वक्तव्य भोवले असल्याची चर्चा रंगली आहे. लातूरकरांनी याठिकाणी काँग्रेस व वंचित आघाडीला भरभरून मतदान केल्याचे दिसते. या ठिकाणी काँग्रेस व वंचित आघाडीने बहुमताकडे वाटचाल सुरु ठेवली आहे.

Sambhaji Patil Nilangekar On Amit Deshmukh
Shiv Sena UBT Politics : उद्धव ठाकरेंच्या माजी आमदाराने, भाजपात गेलेल्या विनायक पांडेंचा पंचनामाच केला!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com