BJP MLA Prashant Bumb News Sarkarnama
मराठवाडा

BJP MLA Prashant Bumb News : काल मराठा आरक्षणाला पाठिंबा अन् आज आमदार बंब यांचे कार्यालय फोडले...

Marathwada Political News : कार्यालय फोडल्यानंतर आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

Jagdish Pansare

Maratha Reservation News : गंगापूर-खुलताबादचे भाजप आमदार प्रशांत बंब यांचे गंगापूर येथील संपर्क कार्यालय आज संतप्त मराठा आंदोलकांनी फोडले. (Maratha Protest News) तीन टर्म निवडून आलेल्या आमदार बंब यांनी मराठा आरक्षणासाठी काहीच केले नाही, असा आरोप करत कार्यालयातील काचा, पोस्टर, खुर्चांची तोडफोड करण्यात आली.

विशेष म्हणजे कालच आमदार बंब (Prashant Bamb) यांनी आपल्या फेसबुक पेजवरून मराठा आरक्षणाला पाठिंबा दर्शवत समाजाला टिकणारे आरक्षण देण्यासाठी सरकारला वेळ देण्याचे आवाहन केले होते. तसेच मराठा समाजातील तरुणांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये, अशी विनंती केली होती. (BJP) सरकारविरोधी घोषणाबाजी करत दुपारी अडीचच्या सुमारास शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील आमदार प्रशांत बंब यांचे कार्यालय मराठा आंदोलकांनी फोडले.

तिथे लावलेल्या बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांच्या छत्रपती संभाजीनगरात पुढील महिन्यात भरवण्यात येणाऱ्या कार्यक्रमाचे बॅनरही आंदोलकांनी जाळले. कार्यालय फोडल्यानंतर आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. (Marathwada) आंदोलनात बाजार समितीचे माजी सभापती विनोद काळे व शेतकरी नेते भाऊसाहेब शेळके यांचा समावेश होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शहरातील वैजापूर रस्त्यावरील आमदार सतीश चव्हाण यांचेही कार्यालये आहे. बंब यांच्या कार्यालयावर हल्ला झाल्यानंतर पोलिसांनी चव्हाण यांच्या कार्यालयाला पोलिस बंदोबस्त दिला आहे. दरम्यान, पोलिसांनी बंब यांच्या कार्यालयावर हल्ला करणाऱ्या मराठा आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर बीआरएसचे संतोष माने यांनी पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांची भेट घेऊन आंदोलकांना सोडून देण्याची विनंती केली. ताईतवाले यांनी आंदोलकांना समज देत आंदोलनाला हिंसक वळण लावू नका, असे आवाहन केले.

मराठा समाजाला पन्नास वर्षांपासून झुलवत ठेवले आहे. आरक्षण आमच्या हक्काचे आहे आणि आम्ही ते मिळवणारच आहोत. आमचा रोष प्रशासनावर नाही, पण लोकप्रतिनिधी मतदारसंघात फिरले तर आम्ही त्यांच्या गाड्या फोडणारच, असा इशारा आंदोलनकर्ते विनोद काळे यांनी दिला. मराठा समाजाचा इतिहास जगाला माहीत आहे. सरकारने गांभीर्याने घ्यावे, नाहीतर यापुढील प्रत्येक आंदोलनाला लोकप्रतींनिधी जबाबदार असतील. मनोज जरांगे यांची प्रकृती अतिशय ढासळली असून, राज्य शासनाने तत्काळ आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणीही भाऊसाहेब शेळके या आंदोलनकर्त्याने केली.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT