Kirtan was performed by Agriculture Officer News Sarkarnama
मराठवाडा

Kirtan was performed by Agriculture Officer : अधिकाऱ्याने `कृषी हरी`, किर्तनातून शेतकऱ्यांना सांगितल्या योजना..

Marathwada : परतूरचे उपविभागीय कृषि अधिकारी राम रोडगे यांनी कृषि व अध्यात्म यांची सांगड घालत कृषि हरी किर्तन कार्यक्रम तयार केला.

सुभाष बिडे

Jalna News : शासकीय योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोचवण्यासाठी अधिकारी काय शक्कल लढवतील? याचा काही नेम नाही. (Kirtan was performed by Agriculture Officer) त्यात शेतकऱ्यांच्या विषयी या योजना असतील तर मग त्या पोहचवण्यासाठी अधिक जोर लावला जातो. पावसाळा सुरू झाला आहे, शेतकरी पेरणीच्या तयारीत आहे, अशावेळी कृषी विभागाकडून शेतकऱ्यांसाठी कोणत्या योजना राबवल्या जात आहेत याची माहिती दिली जात आहे.

यासाठी अधिकाऱ्यांनी चक्क किर्तनाचा आधार घेतला आहे. उपविभागीय अधिकाऱ्यांनी स्वतः किर्तनकारांच्या भूमिकेत `कृषी हरी`, किर्तन सादर करत शेतकऱ्यांसाठीच्या योजनांची माहिती दिली. या अनोख्या उपक्रमाची सर्वत्र सध्या चर्चा होत आहे. (Jalna) कृषि विभागाच्या वतीने सोमवार (ता. १२) रोजी खालापुरी येथे उपविभागीय कृषि अधिकारी राम रोडगे यांनी कृषि हरी किर्तन करून कृषि विभागाच्या विविध योजनांची माहिती (Farmers) शेतकऱ्यांना दिली.

खरीप हंगामाचे पेरणी तोंडावर आहे. बाजारात शेतकऱ्यांची खते, बियाणे व औषधे खरेदीसाठी गर्दी वाढली आहे. कृषि विभागामार्फत कृषि तंत्रज्ञान प्रचार व प्रसार करण्याची मोहिम हाती घेण्यात आली आहे. (Marathwada) त्याचाच एक भाग म्हणुन हा कृषि किर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कृषि विभागामार्फत कृषि मेळावे, शेतीशाळा घेऊन शेतकन्यांना मार्गदर्शन केले जाते.

परंतु या आधुनिक काळात सादरीकरणाची पध्दत बदल्यामुळे अनेक प्रयत्न करूनही शेतकऱ्यांचा प्रतिसाद पाहिजे तसा मिळत नाही. तसेच कृषि विभागाचे सर्व कार्यक्रम सकाळी १० नंतर सुरू होतात. त्यावेळी बहुसंख्य शेतकरी शेती कामानिमित्त शेतामध्ये जातात तसेच या कार्यक्रमात महिलांचा सहभाग नगन्य असतो. म्हणुन या कार्यक्रमाचे दृश्य परिणाम दिसुन येत नाहीत.यावर पर्याय म्हणुन परतूरचे उपविभागीय कृषि अधिकारी राम रोडगे यांनी ज्ञानेश्वरी व तुकारामाची गाथा याचा कृषि विषयासाठी आधार घेऊन कृषि व अध्यात्म यांची सांगड घालत कृषि हरी किर्तन कार्यक्रम तयार केला.

या किर्तनाचा पहिला प्रयोग खालापुरी येथे घेण्यात आला. किर्तनामध्ये बियाणे, खते, औषधे, ठिबक- तुषार, जलसंधारण, शेतकरी आत्महत्या, फळबाग लागवड योजना, विकेल ते पिकेल, पिक विमा योजना, कृषि प्रक्रिया तसेच कृषि विभागाच्या विविध योजना शेतकऱ्यांना ज्ञानेश्वरीतील ओव्यांचा संदर्भ देऊन, अध्यात्मिक दृष्टांतासह सादर करत सांगितल्या. या कार्यक्रमात सर्व कृषि कर्मचारी वारकऱ्याच्या वेशभुषेत सहभागी झाले होते. त्यामुळे उत्साहाचे वातावण तयार झाले. यावेळी परिसरातील शेतकरी व महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT