Chandrakant Khiare On Cm Eknath Shinde : कमी शिकलेल्या शिंदेंची लोकप्रियता कशी वाढली ? मुख्यमंत्र्यांनी सर्वे मॅनेज केला..

Marathwada : विरोधक म्हणून तर भाजप-शिंदे गटाचे फाटले म्हणून मला आनंदच होत आहे.
Chandrakant Khaire-Cm Eknath Shinde News
Chandrakant Khaire-Cm Eknath Shinde NewsSarkarnama
Published on
Updated on

Shivsena UT News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लोकप्रियता वाढल्याची एक जाहिरात आज विविध वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाली. (Chandrakant Khiare On Cm Eknath Shinde) केंद्रात नरेंद्र आणि राज्यात शिंदे, असा दावा करतांनाच मुख्यमंत्रीपदासाठी राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा शिंदे यांना अधिक पसंती असल्याचा दावा देखील या जाहिरातीतून करण्यात आला आहे. ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी या जाहिरातीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकेचे बाण सोडले आहेत.

Chandrakant Khaire-Cm Eknath Shinde News
Abdul Sattar On His PA News : सत्तारांनी मान्य केले, तो माझा पीएच ; मी कोणालाही नेमू शकतो..

मुख्यमंत्र्यांनी आपली टिमकी मिरवण्यासाठी हा सर्वे करून घेतला आहे, तो मॅनेज असून हुशार, चाणाक्ष देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा कमी शिकलेले शिंदे लोकप्रिय कसे? असा सवाल खैरे यांनी उपस्थित केला आहे. (Chandrakant Khaire) खैरे म्हणाले, कोट्यावधी रुपये खर्चून आपला मोठेपणा दाखवण्यासाठी शिंदे यांनीच हा सर्वे त्याच्या चेल्याचपाट्यांकडून करुन घेतला आहे.

यावरून शिंदे (Eknath Shinde) गट आणि भाजपमध्ये असलेले मतभेद देखील चव्हाट्यावर आले आहेत. बाळासाहेबांची शिवसेना म्हणणाऱ्या शिंदेंना जाहिरातीत मात्र साहेबांचा फोटो टाकावासा वाटला नाही. (Shivsena) महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी भाजपने जेव्हा या ४० गद्दारांना पक्षात घेतले तेव्हापासूनच त्यांची प्रतिमा खराब व्हायला लागली.

आता तरी भाजपने या सर्वांना बाहेरचा रस्ता दाखवावा. विरोधक म्हणून तर भाजप-शिंदे गटाचे फाटले म्हणून मला आनंदच होत असल्याचे सांगत खैरेंनी भाजपच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न केला. शिंदेसोबत गेल्याने भाजपला उतरती कळा लागली आहे, उद्धव ठाकरेंसोबत होते तेव्हा फडणवीस मुख्यमंत्री होते, आता त्यांना उपमुख्यमंत्री पद स्वीकारावे लागले. शिंदे यांच्या जाहीरातीनंतर फडणवीस यांचा पडलेला चेहरा आम्ही टीव्हीवर पाहिला, असेही खैरे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com