disqualification of gram panchayat member
disqualification of gram panchayat member Sarkarnama
मराठवाडा

Gram Panchayat Member Disqualification: `त्या` ग्रामपंचायत सदस्य अपात्रतेच्या आदेशाची होणार पुनर्तपासणी..

सरकारनामा ब्युरो

Chhatrapati Sambhajinagar : वेळेत जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या जिल्ह्यातील ११९८ ग्रामपंचायत सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी नुकतेच काढले आहेत. (disqualification of gram panchayat member will be re-examined) मात्र अनेकांनी वेळेत जात वैधता प्रमाणपत्र सादर केल्याचे पुरावे सादर करीत या आदेशावर आक्षेप घेतला.

आक्षेपांच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांकडून काढण्यात आलेल्या आदेशाची पुनर्तपासणी करण्याबाबत जिल्हा प्रशासनात विचार विनिमय सुरू आहे. (Collector) पात्र उमेदवारांना दिलासा देण्याबाबत काय करता येईल याबाबतही चर्चा सुरू आहे. (Aurangabad) छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी यांनी विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या ग्रामपंचायत सदस्यांना दणका दिला आहे.

१ हजार १९८ ग्रामपंचायत (Grampanchayat) सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरविले असल्याने मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे यात अनेक सरपंच आणि उपसरपंच यांचा देखील समावेश आहे. एप्रिल ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील ६१७ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया १८ जानेवारी २०२१ रोजी पूर्ण झाली होती.

या निवडणुकीत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जाती, भटक्या विमुक्त जमाती, इतर मागासवर्गीय व विशेष मागास प्रवर्गातील राखीव जागेवर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र उमेदवारी अर्जासोबत सादर करणे आवश्यक होते. पण विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने जिल्ह्यातील ११९८ ग्रामपंचायत सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरविले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT