Bondhar Haveli Murder Case: बोंढार हवेली हत्याप्रकरणाणे कायदा व सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली गेली..

Ashok Chavan On Bondhar Haveli Murder Case: नांदेड जिल्ह्यात घडलेली ही घटना राज्य सरकारचे अपयश आहे.
Ashok Chavan
Ashok Chavan Sarkarnama
Published on
Updated on

Nanded News : नांदेड जिल्ह्यातील बोंढार हवेली येथील अक्षय भालेराव या तरुणाच्या हत्येने राजकारण तापले आहे. (Ashok Chavan On Bondhar Murder Case) प्रकाश आंबेडकर, जोगेंद्र कवाडेंसह इतर राजकीय पक्षाच्या नेत्यांनी या गावाला भेट देत मयत भालेरावच्या कुटुंबियांची भेट घेत या हत्या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर तातडीने कारवाईची मागणी केली.

Ashok Chavan
Ambadas Danve On Aurangzeb Poster: हिंदुत्वाचे ढोल बडवणाऱ्या सरकारला औरंगजेबाचे पोस्टर दिसत नाहीत का ?

काॅंग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी देखील भालेराव हत्या प्रकरण म्हणजे राज्य सरकारचे अपयश असल्याची टीका केली आहे. अशोक चव्हाण (Ashok Chavan) म्हणाले, बोंढार हवेली येथील अक्षय भालेराव नामक युवकाची हत्या अत्यंत निषेधार्ह आहे. पोलिसांनी दिरंगाई, हलगर्जी न करता या गंभीर प्रकरणाचा योग्यपणे सखोल तपास करून दोषींना कठोर शिक्षा होईल, अशा पद्धतीने आरोपपत्र दाखल करावे. (Nanded)

दरम्यान, कोणीही या प्रकरणाला वेगळे वळण देऊन जिल्ह्यातील वातावरण खराब करू नये व शांतता कायम ठेवावी, असे आवाहनही चव्हाण यांनी केले आहे. अक्षय भालेराव हत्याप्रकरणी २ जून रोजी सकाळी या घटनेबाबत माहिती मिळताच मी संबंधित पोलीस अधिकाऱ्याकडून घटनाक्रम व तपासाच्या प्रगतीची माहिती घेतली. (Marathwada) या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी तातडीने कारवाई करावी, अशी सूचनाही केली.

लोकशाही व संविधानानुसार चालणाऱ्या भारतात अशा घटना घडणे चुकीचे आहे. त्यामुळे सदर हत्या प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर व कठोर शिक्षा होऊन पीडित भालेराव कुटुंबाला न्याय मिळवून देण्याची आवश्यकता आहे. नांदेड जिल्ह्यात घडलेली ही घटना राज्य सरकारचे अपयश आहे. या प्रकरणामध्ये कायदा व सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत.

त्यामुळे राज्य सरकारने तातडीने आपली जबाबदारी स्वीकारून हा तपास वेगाने पूर्ण करावा. तसेच नांदेड जिल्हा व इतरत्र सामाजिक सलोखा तसेच शांततेचा भंग होणार नाही, याकरिता आवश्यक ती पावले उचलावीत, अशी आमची मागणी आहे. त्याचप्रमाणे नांदेडकरांनी शांतता राखावी आणि कोणत्याही अफवांना किंवा अपप्रचाराला बळी पडू नये, असेही आवाहन चव्हाण यांनी केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com