High Court, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

High Court : टीईटी घोटाळा प्रकरणी कारवाई झालेल्या शिक्षकांना वेतन मिळणार, पण वार्षिक वाढ रोखली..

टीईटी घोटाळ्यात राज्यातील ७८८० शिक्षकांवर अपात्रतेची कारवाई करण्यात आली आहे. त्यांचे वेतन देखील थांबवण्यात आले होते. (Aurangabad High Court)

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : राज्यातील शिक्षक पातत्रता चाचणी (टीईटी) घोटाळा प्रकरणी तब्बल साडेता हजाराहून अधिक शिक्षकांवर कारवाई करण्यात आली होती. (TET Scam)या शिक्षकांचे वेतन रोखण्यात आले होते. या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात (High Court) दाखल याचिकेवरील सुनावणीत महत्वाचा निर्णय देण्यात आला.

संबंधित शिक्षकांवर पुढील कारवाई करण्यात येऊ नये असे आदेश न्यायालयाने दिले असून त्यांना या महिन्यापासून वेतन देण्यास सांगितले आहे. (Aurangabad) पण या शिक्षकांची वार्षिक वेतनवाढ मात्र रोखण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

टीईटी घोटाळ्यात राज्यातील ७८८० शिक्षकांवर अपात्रतेची कारवाई करण्यात आली आहे. त्यांचे वेतन देखील थांबवण्यात आले होते. या विरोधात दाखल याचिकेवर आज सुनावणी झाली. न्यायालयाने अशा शिक्षकांवर पुढील कारवाई न करण्याचे आदेश देतानाच शिक्षकांना या महिन्यापासून वेतन देण्याचे मात्र वार्षिक वेतनवाढ न देण्याचे आदेश दिले आहेत.

औरंगाबाद खंडपीठात झालेल्या सुनावणीत न्या. रविंद्र घुगे आणि न्या. अरुण पेडणेकर यांनी हे आदेश दिले आहेत. याचिकेवरील पुढील सुनावणी १४ नोव्हेंबरला ठेवण्यात आल्याची माहिती ॲड. संभाजी टोपे यांनी दिली.

टीईटी परिक्षा पास न होता नोकरी मिळवलेल्या साडेसात हजाराहून अधिक शिक्षकांवर राज्य शासनाने कारवाई करत त्यांचे वेतन बंद केले होते. या निर्णायाच्या विरोधात हिंगोली जिल्ह्यातील तीन शिक्षकांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT