Jayant Patil : फडणवीस सोबत नसतील तर मुख्यमंत्र्यांचे दिल्लीत कुणी ऐकेल तरी का ?

उपमुख्यमंत्री फडणवीस सोबत गेल्याशिवाय शिंदेचं तिथे कोण ऐकणार? त्यामुळे एकट्याने दिल्लीला जाऊन काही साध्य होणार नाही. (Ncp Leader Jayant Patil)
Ncp State president Jayant Patil
Ncp State president Jayant Patil Sarkarnama
Published on
Updated on

हिंगोली : राज्यातील विकास कामांना गती मिळावी, रखडलेले प्रश्न मार्गी लागावेत आणि वेदांता प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे निर्माण झालेले वादळ कसे रोखायचे? हे सगळे प्रश्न घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे आपल्या काही मंत्र्यांना घेऊन दिल्लीला जाणार आहेत. रेल्वे मंत्र्यांसह अनेक केंद्रीय मंत्र्यांना ते भेटणार आहेत. पण या भेटी संदर्भात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी खोचक टीका केली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस (Devendra Fadanvis) दिल्ली दौऱ्यात सोबत नसतील तर मुख्यमंत्र्यांना केंद्रातील मंत्री, हायकमांड भेटतील तरी का? असा टोला त्यांनी लगावला आहे. दिल्लीत मुख्यमंत्र्यांपेक्षा उपमुख्यमंत्र्यांचीच चलती आहे, असेही पाटील म्हणाले.

वेदांता प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच पेटले आहे. विरोधक शिंदे-फडणवीस सरकारवर अक्षरशः तुटून पडले आहेत. विरोधकांच्या टीकेला उत्तर देतांना सरकारची दमछाक होत असतांनाच मुख्यमंत्री दिल्लाला जात आहेत.

विशेष म्हणजे ते एकटे आपल्या काही मंत्र्यांना घेऊन दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, अश्विनी वैष्णव, रावसाहेब दानवे यांची भेट घेणार आहेत. उद्योग व कृषीमंत्री देखील त्यांच्यासोबत या दिल्लीवारीत असणार आहेत.

Ncp State president Jayant Patil
Shivsena : औरंगाबाद शिवसेनेला नव्या जिल्हाप्रमुखाची गरज ? दानवेंचा भार वाढला..

या दिल्ली भेटी संदर्भात हिंगोली दौऱ्यावर असलेल्या जयंत पाटील यांनी भाष्य केले. जयंत पाटील म्हणाले, देवेंद्र फडवणीस सोबत नसतील तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हायकंमाड भेट देखील देणार नाही.

उपमुख्यमंत्री फडणवीस सोबत गेल्याशिवाय शिंदेचं तिथे कोण ऐकणार? त्यामुळे एकट्याने दिल्लीला जाऊन काही साध्य होणार नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दिल्लीत जेवढे ऐकले जाते, तेवढे शिंदेंचे ऐकले जाईल का? अशी शंका देखील पाटील यांनी उपस्थितीत केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com