Ambadas Danve News Sarkarnama
मराठवाडा

Ambadas Danve News : पंकजा मुंडे चार वर्षांपासून फक्त इशारेच देताहेत, करत काहीच नाहीत...

Shivsena News : पंकजा मुंडे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध आहेत.

Jagdish Pansare

Marathwada Political News : राज्यात काल झालेल्या चार दसरा मेळाव्याची चर्चा अजूनही सुरू आहे. सावरगावच्या भगवान भक्तीगडावर पंकजा मुंडे यांनी दसरा मेळाव्यात केलेल्या भाषणावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. (Ambadas Danve News) ज्या पंकजा मुंडे यांच्याबद्दल शिवसेना ठाकरे गटाचा नेहमीच साॅफ्ट काॅर्नर राहिला आहे, त्या ठाकरे गटाचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते यांनी पंकजा यांच्या भाषणावर केलेल्या भाष्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी आपल्या भाषणातून दिलेल्या इशाऱ्याबद्दल माध्यमांनी दानवे यांना प्रश्न विचारला तेव्हा पंकजाताई नेहमीच बोलतात, पण करत काहीच नाही, अशी प्रतिक्रिया दिली. गेल्या चार वर्षांपासून दसरा मेळाव्यातून त्या आपल्या पक्षाला, नेत्यांना इशारे देतात. (Shivsena) तुमचाच पक्ष आहे, तुमचेच नेते आहेत, जाऊन त्यांना जाब विचारा, मेळाव्यातून इशारे देऊन काय होणार आहे. हा त्यांचा व्यक्तिगत आणि पक्षांतर्गत विषय आहे, असे म्हणत दानवे यांनी अधिक बोलणे टाळले.

काल झालेल्या मुंबईतील एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे आणि सावरगावच्या भगवान भक्तीगडावरील पकंजा मुंडे यांच्या भाषणाची आज दुसऱ्या दिवशीही राज्यभरात चर्चा होताना दिसते आहे. (Maharashtra) पंकजा मुंडे आपल्या मेळाव्यातून काहीतरी ठोस निर्णय घेतील, भूमिका मांडतील अशी सर्वांनाच अपेक्षा होती. परंतु याही मेळाव्यात त्यांनी भावनिक भाषण करत पक्ष किंवा नेतृत्वाबद्दल थेट टीका करणे किंवा टोकाची भूमिका घेणे टाळले. त्यामुळे पंकजा यांच्या भाषणाने हिरमोड केल्याच्या प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पंकजा मुंडे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध आहेत. अगदी दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्यापासून हे संबंध बाळासाहेब आणि त्यांच्यानंतर उद्धव ठाकरे यांनी जोपासले. उद्धव ठाकरे पंकजा यांना आपल्या बहीण मानतात. भाजपकडून पंकजा यांच्यावर अन्याय होत असल्याचे लक्षात आल्यावर उद्धव ठाकरे यांनी पंकजा यांना धीरही दिला होता. पक्षातील इतर नेत्यांनी पंकजा यांना शिवसेनेची द्वारे कायम खुली आहेत, असे म्हणत पक्षात येण्याची आॅफरही दिली होती.

पंकजा यांच्याबाबतीत शिवसेना आणि ठाकरे कुटुंबांमध्ये आपुलकीचे नाते असताना याच पक्षाचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मात्र पंकजा यांच्या भूमिकेवर टीका केली. पंकजाताई नेहमीच बोलतात, पण करत काहीच नाहीत. चार वर्षांपासून त्या मेळाव्यातून फक्त इशारेच देत आहेत, असेही दानवे म्हणाले. पंकजा यांच्या भाषणाबद्दल दानवे यांनी थेट माध्यमांसमोर आपली भूमिका मांडल्याने शिवसेनेने पंकजा मुंडे यांच्याबाबतीतले आपले धोरण बदलले आहे की काय? अशी शंका उपस्थितीत केली जात आहे. पंकजा मुंडे यांनी आता नाराजीचा सूर आळवण्याऐवजी ठोस भूमिका आणि निर्णय घ्यावा, अशी पंकजा समर्थकांप्रमाणेच ठाकरेंच्या शिवसेनेचीही इच्छा असल्याचे दानवेंच्या विधानावरून दिसून आले आहे.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT