Dasara Melava 2023
Dasara Melava 2023Sarkarnama

Dasara Melava 2023 News : मेळावे यशस्वी झाल्याने शिंदे-ठाकरे गटात उत्साहाचे वातावरण...

Shivsena News : आगामी लोकसभा निवडणुका पाहता या वेळी ठाकरे आणि शिंदे यांनी आक्रमक भाषण केले.
Published on

Maharashtra News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचे मुंबईतील मेळावे यशस्वी ठरले. कोणाचे भाषण चांगले झाले, कोणत्या मेळाव्याला जास्त गर्दी होती, अशी चर्चा जरी सध्या सुरू असली तरी दोन्हीकडे चांगली गर्दी झाल्याने ठाकरे-शिंदे गटामध्ये सध्या उत्साहाचे वातावरण आहे. (Dasara Melava News) शिवसेनेत फूट पडल्यानंतरचा कालचा दुसरा दसरा मेळावा होता. पहिल्या वर्षी मैदानावरून दोन्ही गटांत संघर्ष झाला; पण यंदा तो फारसा दिसला नाही.

Dasara Melava 2023
Maratha Reservation News : मराठा तरुण बलिदान देत असताना वाढदिवस साजरा करणे मला पटत नाही...

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दैवत मानणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी शिवाजी पार्कवरील शिवतीर्थाचा फारसा आग्रह न धरता आपला मैळावा आझाद मैदानावर घेण्याचा मनाचा मोठेपणा दाखवला. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) राज्याचे मुख्यमंत्री असल्यामुळे त्यांच्या मेळाव्याला गर्दी जमवण्याचे आवाहन मंत्री, खासदार आणि आमदारांनी घेतली होती. (Uddhav Thackeray) त्यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा त्यावरून राजकीय नेत्यांवर बंदीचे करण्यात आलेले आवाहन याचा फारसा परिणाम मेळाव्यावर झाला नाही.

आता ही गर्दी कशी आणि कुठून आली, खरंच एकनाथ शिंदे यांचे विचार ऐकण्यासाठी आली होती की, मग दिवसभर मुंबईची सैर करून दोन तास सभास्थळी खुर्चीवर बसण्यासाठी हा वादाचा विषय ठरू शकतो. (Maharashtra) मात्र, आझाद मैदान गर्दीने फुलून गेले होते. एकनाथ शिंदे यांनीही उपस्थितांना अपेक्षित भाषण करत ठाकरे गटावर जोरदार हल्ला चढवला. तिकडे शिवतीर्थावर उद्धव ठाकरेंच्या भाषणाला गर्दी जमणार हे स्पष्टच होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिंदे गटाने केलेल्या उठावानंतर उद्धव ठाकरे यांना राज्यभरात सहानुभूती आहे हे वेळोवेळी दिसून आले आहे. गेल्या दसरा मेळाव्यालाही शिवसैनिकांची मोठी गर्दी झाली होती, याहीवर्षी ती कायम होती. शिवसेनेची ताकद विभागली गेली असली तरी शिवाजी पार्क किंवा आझाद मैदान भरण्यासाठी लागणारी संख्या जमवणे या दोन्ही पक्षांना कठीण नाही. एकनिष्ठ-गद्दारांचा मेळावा अशी एकमेकांची खिल्ली दोन्ही प्रमुख वक्त्यांनी आपल्या भाषणातून उडवली. दोन्ही बाजूंनी तासभर एकमेकांवर यथेच्छ आरोप-प्रत्यारोप झाले.

आगामी लोकसभा निवडणुका पाहता, या वेळी ठाकरे आणि शिंदे यांनी आक्रमक भाषण केले. हातचे काही राखून न ठेवता हे दोघेही बोलले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या मवाळ भूमिकेवर बोलणारेही कालच्या त्यांच्या भाषणानंतर प्रभावित झाले, तर एकनाथ शिंदे यांनी आता आपल्याला भाजपशिवाय पर्याय नाही हे आपल्या भाषणातून व्यासपीठावर बसलेल्या व समोर उपस्थितांपैकी शिवसैनिकांना भासवण्याचा प्रयत्न केला.

Dasara Melava 2023
Pankaja Munde Dasara Melava : 'संघर्षकन्या' पंकजा मुंडे यांचे भगवान गडावरून शाब्दिक वार...!

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून अडचणीत सापडलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला प्रामाणिकपणा सिद्ध करण्यासाठी व्यासपीठावरून थेट शिवाजी महाराजांची शपथ घेत मराठा समाजाची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला. या दोन्ही मेळाव्यांनी काल राज्यभरातून आलेल्या लोकांची निराशा केली नाही.

राज्यातील राजकीय परिस्थिती, सरकारविरोधात मराठा, धनगर, ओबीसींचा आक्रमक पावित्रा पाहता हे मेळावे यशस्वी होतात की फ्लाॅप? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. पण दोन्ही मेळावे यशस्वी झाल्यामुळे ठाकरे आणि शिंदेंच्या शिवसैनिकांना आगामी निवडणुकीच्या तयारीसाठी बूस्टर डोस मिळाला आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com