MVA NEWS Sarkarnama
मराठवाडा

Maha Vikas Aghadi News: मोठी बातमी! काँग्रेस-राष्ट्रवादीनं पाठीत खंजीर खुपसला; महाविकास आघाडीतून ठाकरे गट पडला बाहेर

Udgir Agricultural Produce Market Committee Election : आगामी निवडणुका स्वबळावर लढणार...

सरकारनामा ब्यूरो

युवराज धोतरे :

Udgir News : जिल्ह्यातील लातूरनंतर सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीसाठी शुक्रवारी मतदान होत आहे.अवघ्या तीन दिवसांवर मतदान आले आहे. याचवेळी मात्र, राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. राज्यात एकीकडे उध्दव ठाकरेंनी महाविकास आघाडीच्या टिकवण्यासाठी कंबर कसली आहे. मात्र, उदगीर कृषी उत्पन्न समितीच्या निवडणुकीत मात्र ठाकरे गटानं काँग्रेस-राष्ट्रवादीने पाठीत खंजीर खुपसल्याचा गंभीर आरोप करत महाविकास आघाडीतून बाहेर पडला आहे.

महाविकास आघाडी(Mahavikas Aaghadi )तील प्रमुख घटक पक्ष असलेल्या ठाकरे गटानं कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत प्रचार न करण्याचा निर्णय सोमवारी (दि.२४) जाहीर केला आहे. या अगोदर ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचे फोटो निवडणुकीच्या प्रचारात बॅनरवर दिसत होते. त्यामुळे मतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते.

आता याबाबत सोमवारी दुपारी उदगीर येथे शिवसेना ठाकरे गटा(Uddhav Thackeray)ने पत्रकार परिषद घेऊन बाजार समितीच्या निवडणुकीत शिवसेना अलिप्त राहणार असून यापुढे प्रचारातील बॅनर वरून पदाधिकाऱ्यांचे फोटो काढून टाकण्यात यावे अशी सूचना त्यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाप्रमुखांना दिली असल्याचं सांगितलं आहे.

ठाकरे गटाला आघाडीतून वगळलं...

उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूकी(Udgir Agricultural Produce Market Committee Election) चा कार्यक्रम घोषित झाल्यापासून महाविकास आघाडीच्या माध्यमातून बाजार समितीची निवडणूक लढविण्याच्या हालचाली झाल्या होत्या. त्या दृष्टीने उमेदवारी अर्ज सुद्धा दाखल झाले होते.परंतू, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी बरीच राजकीय उलथापालथ होऊन चर्चेत नसलेली अनपेक्षित आघाडी अस्तित्वात आली.

यात शिवसेना(Shivsena) ठाकरे गटाला महाविकास आघाडीतून वगळण्यात आले. सुरुवातीला शिवसेना पक्षाकडून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडे दोन जागांची मागणी करण्यात आली होती, ती मागणी मान्य करण्यात आली असल्याचे सोमवारी शिवसेनेचे तालुकाप्रमुख कैलास पाटील यांनी सांगितले.परंतु उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी झालेल्या राजकीय घडामोडीमध्ये शिवसेनेला वगळण्यात आले.

आघाडीने शिवसेनेचा विश्वासघात केला..

तालुक्यातील एका विशिष्ट समाजाला महाविकास आघाडी मध्ये झुकते माप देऊन सर्वसामान्य कार्यकर्त्यावर अन्याय करण्यात आला असून केवळ पैशाच्या जोरावर महाविकास आघाडीने शिवसेनेचा विश्वासघात केल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.

आगामी निवडणुका स्वबळावर लढणार

येत्या दोन दिवसांत शिवसेना पक्ष म्हणून वेगळी भूमिका जाहीर करणार असल्याचे सांगून निवडणुकीच्या प्रचारापासून महाविकास आघाडीच्या प्रचारापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. येणाऱ्या नगरपालिका पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये सुद्धा शिवसेना स्वतःच्या ताकदीवर लढणार असल्याचे त्यांनी सांगितले.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT