Dhule BJP news : आमदार जयकुमार रावल यांच्या विरोधात भाजप नेत्यांचे बंड?

विकासात भेदभावाचा आरोप करीत ज्ञानेश्वर भामरे यांचा जिल्हा परिषद सदस्यत्वाचा राजीनामा
Jaykumar Rawal
Jaykumar RawalSarkarnama
Published on
Updated on

Shindkheda BJP news : आमदार जयकुमार रावल यांच्या मतदारसंघात भाजपमध्ये वाद उफाळून आला आहे. विकासकामांबाबत अन्याय होत असल्याच्या निषेधार्थ ज्ञानेश्वर भामरे यांनी जिल्हा परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. यातून शिंदखेडा तालुक्यात भामरे यांच्याविरूद्ध भाजपसह रावल समर्थक आमने-सामने आले. त्यावरून राजीनाम्यावरून आरोप- प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत. (Friction on BJP`s two groups in Jaykumar Rawal constituency)

मेथी (ता. शिंदखेडा) गटातील (Dhule) विकास कामे होत नसल्याने जिल्हा परिषद (ZP) सदस्य ज्ञानेश्वर भामरे (Dnyaneshwar Bhamre) यांनी जिल्हा परिषदेसह भाजपच्या (BJP) सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यांनी आमदार जयकुमार रावल (Jaykumar Rawal) यांच्यावर आरोप केला. या राजीनाम्यावरून भाजप विरूद्ध राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) असे चित्र निर्माण झाले.

Jaykumar Rawal
Shivsena News: ठाकरेंच्या सभेत गुलाबरावांचे हात दाखवून अवलक्षण?

यासंदर्भात राजीनामा विहित नमुन्यात नसल्याने श्री. भामरे यांचे ते ढोंग असल्याची टीका आमदार जयकुमार रावल समर्थकांसह भाजपने केली होती. त्यामुळे राजकारण तापले आहे. विशेष म्हणजे भामरे यांच्या राजीनाम्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी मात्र समर्थन केले आहे. यानंतर त्यांना अपेक्षित पद्धतीने भामरे यांनी राजीनामा दिला आहे. तो मंजूर झाल्यानंतर कर्ले, परसुळे (ता. धुळे) येथे भाजपसह रावल समर्थकांनी जल्लोष केला.

भाजपचे नेते आमदार जयकुमार रावल यांच्या समर्थकांसह भाजप कार्यकर्त्यांनी श्री. भामरे यांनी प्रथम दिलेला राजीनामा योग्य, विहित नमुन्यात नसल्याने आक्षेप घेतला होता. त्यामुळे श्री. भामरे यांनी विरोधकांना अपेक्षित अशा तरतुदीनुसार राजीनामा दिला आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष अश्‍विनी पवार, सदस्य भीमराव ईशी, आशुतोष पाटील यांच्या समक्ष राजीनामा दिल्याचे श्री. भामरे यांनी सांगितले.

Jaykumar Rawal
Pachora APMC Election: पाचोऱ्याच्या तिरंगी लढतीत नेत्यांकडून साम, दाम, दंड!

राजीनामा मंजूर झाल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी शिंदखेडा तालुक्यातील काही गावांमध्ये आतषबाजीतून आनंद व्यक्त केला. यासंदर्भात श्री. भामरे यांनी सांगितले, की जिल्हा परिषदेत मी सांगितलेली विकास कामे करायची नाहीत, अशी सूचना आमदार रावल यांनी जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांना दिल्याचे स्पष्ट होते, असा आरोप आहे.

यातून मेथी गटातील गावे आमदार रावल यांच्या शिंदखेडा विधानसभा मतदारसंघातील आहेत. या गावांचा विकास रोखून आमदार रावल यांनी त्यांना मते देणाऱ्या मतदारांचा अवमान केला आहे. त्यामुळे विकास कामाबाबत बोलण्याचा आमदार रावल यांना नैतिक अधिकार नाही. भविष्यात मते मागताना तालुक्यातील मतदार आमदार रावल यांच्यासह भाजपला जाब विचारल्याशिवाय राहणार नाहीत.

Jaykumar Rawal
Sanjay Raut Tweet: संजय राऊत हे राहुल कुल यांचा पिच्छा सोडेनात; फडणवीसांनी दखल न घेतल्याने सीबीआयला पत्र !

शिंदखेडा तालुक्यातील आणखी काही जिल्हा परिषद सदस्यांची विकास कामे रोखण्यात आलेली आहेत. ही हुकूमशाही म्हणावी लागेल, असे सांगत जिल्हा परिषदेमध्ये शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल होतात, त्याचे त्यांना काही घेणे देणे नाही. तसेच अनेक सरपंचांवर काही कारणातून दबाव आणला जातो, असाही आरोप श्री. भामरे यांनी केला आहे.

कोळी यांचे पत्रक

राष्ट्रवादी काँग्रेस किसान सभेचे जिल्हा सरचिटणीस गोपाल कोळी यांनी श्री. भामरे यांच्या राजीनामाच्या समर्थनार्थ म्हटले आहे, श्री. भामरे हे कधीही नाटक किंवा षडयंत्र करीत नाहीत. ते भाजपकडून केले जाते. भामरे यांच्या राजीनाम्यानंतर भाजपचे तालुकाध्यक्ष रमेश खैरनार यांनी मांडळ येथे जल्लोष करीत पत्रक काढले होते. त्यांना श्री. भामरे यांच्या नावाची इतकी भीती का आहे की विरोधकांना जल्लोष करावा लागतो? विरोधकांसह आमदारांकडून श्री. भामरे यांना आगामी विधानसभा निवडणुकीची उमेदवारी कशी मिळणार नाही यासाठी प्रयत्न होत आहेत.

Jaykumar Rawal
Bhusawal APMC Election: एकनाथ खडसे देणार भाजपच्या आमदार सावकारेंना शह!

भामरे यांना आव्हान

भाजपचे माजी तालुकाध्यक्ष नथा वारुळे यांनी हिंमत असेल तर श्री. भामरे यांनी पुन्हा मेथी गटात निवडून दाखवावे, असे आव्हान दिले आहे. मेथी गट हा भाजपचा बालेकिल्ला आहे. या गटातील गावांमध्ये भाजपचे सरपंच आहेत. याठिकाणी सत्तेनंतर विकासकामांसाठी कोट्यवधींचा निधी दिला गेला आहे. या ठिकाणी आमदार रावल यांनी दिलेला उमेदवार निवडून येतो. श्री. भामरे हे राष्ट्रवादीमध्ये असताना सलग चार वेळा निवडणुकीत पराभूत झाले आहेत. त्यांनी राजकीय पुनर्वसनासाठी आमदार रावल यांच्या नेतृत्वात भाजपचे काम करेल या बोलीवर मेथी गटातून उमेदवारी मिळविली. विजयानंतर ते बदलले. त्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागणार होता, असे श्री. वारुळे यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com