Guardian Minister Ashok Chavan
Guardian Minister Ashok Chavan Sarkarnama
मराठवाडा

अनेक संकटं आली, वादळं आली ; पण मी कधी डगमगलो नाही, थांबलो नाही

जगदीश पानसरे

नांदेड ः राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांचा वाढदिवस काल साजरा झाला. देगलूर-बिलोली निवडणूकीचा प्रचार थांबत नाही तोच प्राप्तीकर विभागाने चव्हाण यांच्यांशी संबंधित चार सारखर कारखान्यांना दिलेल्या कर्जाची चौकशी सुरू केली. पोटनिवडणुकीचे मतदान अवघ्या २४ तासांवर आलेले असतांना झालेली ही कारवाई संशयस्पाद आणि राजकीय द्वेषातून करण्यात आल्याची प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.

या पार्श्वभूमीवर देखील चव्हाण यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरातून त्यांच्या चाहत्यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या. या सर्वांचे आभार त्यांनी आज ट्विटच्या माध्यमातून व्यक्त केले. परंतु या ट्विटमधून त्यांनी प्राप्तीकर विभागाकडून सुरू असलेल्या चौकशीच्या अनुषंगाने देखील आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

`अनेक संकटं आली, अनेक वादळं आली. आपला भक्कम पाठिंबा आणि आशीर्वादामुळे कधी थांबलो नाही, कधी डगमगलो नाही. तुम्हा सर्वांची हीच साथ माझी खरी शक्ती आणि काम करण्याची उर्जा आहे. वाढदिवसाला दिलेल्या आभाळभर शुभेच्छांसाठी सर्वांच मनःपूर्वक आभार`. अशा शब्दात चव्हाण यांनी आपल्या चाहत्यांचे आभार मानले आहेत.

काॅंग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या आकस्मिक निधनामुळे देगलूर-बिलोली विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर झाली. ही पोटनिवडणूक बिनविरोध होऊन जितेश अंतापूरकर यांना त्यांच्या वडिलांच अधुरे स्वप्न पुर्ण करण्याची संधी द्यावी यासाठी चव्हाण यांनी प्रयत्न केले. पण यात त्यांना यश आले नाही आणि उद्या ३० रोजी या निवडणुकीसाठी मतदान होत आहे.

अशोक चव्हाण यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली असून प्रचारासाठी त्यांनी अख्खा मतदारसंघ पिंजून काढला. महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री, लोकप्रतिनिंधींची देखील त्यांना साथ मिळाली. भाजपने देखील ही निवडूक गांभीर्याने घेत अशोक चव्हाण यांच्यासमोर तगडे आव्हान उभे केले आहे. आता अशोक चव्हाण यांच्यांशी संबंधित जिल्ह्यातील चार साखर कारखान्यांना बुलडाणा अर्बन क्रेडीट सोसायटीने दिलेल्या कर्ज प्रकरणाची अचानक प्राप्तीकर विभागाने चौकशी सुरू केली.

गेल्या तीन दिवसांपासून ही चौकशी सुरू असल्याचे समजते. पोटनिवडणुकीचा प्रचार संपत नाही तोच, ही कारवाई झाल्याने अशोक चव्हाण यांना अडकवण्याचा भाजपचा हा प्रयत्न असल्याचा आरोप काॅंग्रेसकडून केला जात आहे. अशोक चव्हाण यांनी स्वतः मतदानाच्या तोंडावर झालेली ही कारवाई राजकीय द्वेष भावनेतून केल्याचा आरोप केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT