मी सुद्धा मराठी माणूसच ना, मग अडीच वर्ष कशाला ठेवलं?, तेव्हा कुठे होता मराठी माणूस?

अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी वानखेडे प्रकरणावर मतप्रदर्शन केले.
Sameer Wankhede & Chhagan Bhujbal
Sameer Wankhede & Chhagan BhujbalSarkarnama
Published on
Updated on

पुणे : मी ही मराठी माणूसच होतो ना, मग अडीज वर्ष कशाला ठेवलं? तेव्हा कुठे गेला होता मराठी माणूस? आणि आता कोर्ट सांगत आहे की, त्यांनी काहीच केलं नाही, असा टोला अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी भाजपला लगावलाय.

Sameer Wankhede & Chhagan Bhujbal
मोठी बातमी: समीर वानखेडे विरोधात फसवणूक, खोटे कागदपत्र तयार केल्याची तक्रार दाखल

बहुचर्चित असणाऱ्या आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात एन सी बी चे अधिकारी समीर वानखेडे हे वादाच्या भोवऱ्यात आहेत. समीर वानखेडे याची बाजू घेणाऱ्या भाजपला ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी चांगलेच फटकारले. याबाबत वानखेडे यांच्या पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मराठी माणसाला न्याय मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

Sameer Wankhede & Chhagan Bhujbal
दक्षिणा मिळत नसल्याने तुषार भोसले यांचे मानसिक संतुलन बिघडले

या प्रश्नाला उत्तर देताना छगन भुजबळ यांनी ही प्रतिक्रिया दिली. त्यासोबतच समीर वानखेडे यांच्या आई लाडाने त्याच्या वडिलांना दाऊद हाक मारायच्या, यावरही भुजबळ यांनी मिश्किल शब्दात टिप्पणी केली आहे.

भुजबळ म्हणाले की, मी पहिल्यांदा ऐकलं की लाडाने दाऊद म्हणतात, आमच्याकडे अहो जा हो, मुन्नू, टून्नू, अशी हाक मारतात. या संपूर्ण प्रकरणात रेड खरी होती का?, तसेच समीर वानखेडे यांनी जातीचे आरक्षण घेऊन भारत सरकारला फसवलं आहे का? या सगळ्या बाबी तपासात समोर येतीलच.

भुजबळ म्हणालेत की, नवाब मलिक पुराव्यासह सर्व गोष्टी समोर आणताहेत. त्यामुळे सत्याला राष्ट्रवादीचा पाठिंबा आहे.

...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com