Uddhav Thackeray -Sanjay Shirsat News Sarkarnama
मराठवाडा

Sanjay Shirsat On Mahavikas Aghadi : मुंबई महापालिकेपासूनच आघाडीत बिघाडी होणार..

Maharashtra : शिरसाट यांनी संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून `तुम्ही कोणाचे नेतृत्व मानता`, या प्रश्नाला प्रत्युत्तर दिले.

सरकारनामा ब्युरो

Shivsena : राज्यात झालेली तीन पक्षांची महाविकास आघाडी टिकणार नाही, असा दावा शिवसेनेचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे. (Sanjay Shirsat On Mahavikas Aghadi) वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर युतीसाठी तुमच्याकडे आले नव्हते, तुम्ही त्यांच्याकडे गेला होतात. त्यामुळे त्यांच्या सन्मान देखील ठाकरे गटाला राखावा लागणार आहे. राष्ट्रवादी, काॅंग्रेस आणि वंचितला सोबत घेवून मुंबई महापालिकेत किती जागा देणार? स्वत: ठाकरे गट किती लढवणार? हा खरा प्रश्न आहे.

त्यामुळे मुंबई महापालिकेच्या जागा वाटपातूनच महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) बिघाडीला सुरूवात होईल, असे भाकित देखील शिरसाट यांनी केले. छत्रपती संभाजीनगर येथे माध्यमांशी बोलतांना शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून `तुम्ही कोणाचे नेतृत्व मानता`, या प्रश्नाला प्रत्युत्तर दिले. यासोबत मंत्रीमंडळ विस्तार, संजय राऊत, अजित पवार यांच्याविषयी विचारलेल्या प्रश्नांना देखील शिरसाट यांनी उत्तरे दिली.

संजय शिरसाट म्हणाले, संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना विचारेल्या प्रश्नाचे आधी मी उत्तर देतो, की आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नेतृत्व आणि विचार मानतो. (Shivsena) आता तुम्ही कुणाचे नेतृत्व मानता याचे उत्तर द्या. संजय राऊत यांनी शिवसेनेचे वाटोळे केले आहे, त्यांनी स्वीकारलेली जबाबादीर पार पाडली, आता तरी शांत बसावे.

ठाकरे गटाची ताकद आता पहिल्यासारखी राहिलेली नाही. महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभेत उद्धव ठाकरेंना जेव्हा वेगळी खुर्ची दिली होती, ती दुसऱ्या सभेत बदलण्यात आली. याचा अर्थ काॅंग्रेस-राष्ट्रवादी ठाकरे गटाला समान पातळीवर पाहत आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेत एकत्र लढण्याची भाषा फक्त राष्ट्रवादी करत आहे.

कारण मुंबईत आपली ताकद नाही हे अजित पवारांनी मान्यच केले आहे. काॅंग्रेसने मात्र अद्याप एकत्र महापालिका लढण्यासंदर्भात कुठलेही भाष्य केलेले नाही. त्यामुळे मुंबई महापालिकेतील जागा वाटपावरूनच महाविकास आघाडीत बिघाडी होण्यास सुरूवात होईल, असा दावा शिरसाट यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT