Hingoli Loksabha Constituency News : हिंगोलीच्या जागेवर काॅंग्रेसच्या दाव्याने ठाकरे गटाचे टेन्शन वाढले..

Congress : हिंगोलीवर दावा सांगून इतर एखादी जागा पदरात पाडून घेण्यासाठी काॅंग्रेसने केलेली ही खेळी असल्याचे बोलले जाते.
Hingoli Loksabha Constituency News
Hingoli Loksabha Constituency NewsSarkarnama
Published on
Updated on

Marathwada : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप विरोधात एकत्रित लढणाऱ्या महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपासाठी बैठकांचे सत्र सुरू आहे. (Hingoli Loksabha Constituency News) मुंबईच्या टिळक भवनात दोन दिवसांपासून काॅंग्रेसचे राज्यातील नेते महाराष्ट्रातील सर्वच लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेत आहेत. यात मराठवाड्यातील हिंगोली मतदारसंघावर काॅंग्रेसकडून दावा करण्यात आल्याची माहिती आहे.

Hingoli Loksabha Constituency News
Ambadas Danve On Aimim March News : झुंडशाही माजवणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहून राजकीय पोळी भाजण्याचा एमआयएमचा प्रयत्न...

हिंगोलीत (Hingoli) काॅंग्रेसचे संघटन असल्याचा दावा करत ही जागा आपल्याला मिळावी, अशी मागणी केली जात आहे. या नव्या मागणीमुळे ठाकरे गटाचे मात्र टेन्शन वाढले आहे. (Shivsena) शिवसेनेत फूट पडण्याआधी ज्या ठिकाणी पक्षाचे खासदार होते, त्या सर्व जागा ठाकरे गट लढवणार आहे. हिंगोलीत देखील पक्षाने जोरदार तयारी सुरू केली आहे.

विद्यमान खासदार हेमंत पाटील हे शिंदे गटासोबत गेल्याने ठाकरे गट त्यांच्याविरोधात तगडा उमेदवार देण्याच्या तयारीत आहेत. (Congress) पक्ष फुटीनंतर पुर्वी शिवसेना सोडून गेलेले माजी खासदार सुभाष वानखेडे पुन्हा ठाकरे गटात परतले आहेत. त्यांच्याकडे संभाव्य उमेदवार म्हणून पाहिले जात आहेत. या शिवाय माजीमंत्री जयप्रकाश मुंदडा यांचे देखील नाव चर्चेत आहे.

तर काॅंग्रेसकडून तीनवेळा आमदार राहिलेले भाऊसाहेब पाटील गोरेगावकर यांचे नाव सर्वाधिक चर्चेत आहेत. या शिवाय विधान परिषदेच्या आमदार प्रज्ञा सातव यांच्याही नावाचा विचार सुरू असल्याचे बोलले जाते. काॅंग्रेसने दावा केला असला तरी ठाकरे गट हिंगोलीची जागा कदापी सोडणार नाही, असेच दिसते.

या जागेवरून महाविकास आघाडीत बिघाडी होईल, अशी देखील शक्यता नाही. काॅंग्रेसच्या दबाव तंत्राचा हा भाग असू शकतो. हिंगोलीवर दावा सांगून इतर एखादी जागा पदरात पाडून घेण्यासाठी काॅंग्रेसने केलेली ही खेळी असल्याचे बोलले जाते. महाविकास आघाडीतील तीन्ही पक्षांची एकत्रित बैठक जेव्हा होईल, तेव्हाच जागा वाटपावर शिक्कामोर्तब होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com