Protest Against Raosaheb Danve in Jalna Sarkarnama
मराठवाडा

नाभिक समाज संतप्त, रावसाहेब दानवेंची अर्धी कटिंग करणाऱ्याला २१ हजारांचे बक्षिस देणार..

आंदोलना दरम्यान नाभिक समाजाच्या आंदोलकांनी हातात काळ्या रंगाचे झेंडे घेऊन दानवे यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवत जोरदार घोषणाबाजी केली. (Raosaheb Danve)

सरकारनामा ब्युरो

जालना : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर टीका करतांना तिरुपती बालाजी मंदिरातील न्हाव्यांचे उदाहरण दिले होते. (jalna) यावरून नाभिक समाजामध्ये संतापाचे वातावरण आहे. (Raosaheb Danve) नाशिकमध्ये दानवे यांना माफी मागितल्याशिवाय पाय ठेवू देणार नाही, अशी भूमिका घेतल्यानंतर आज जालन्यात दानवे यांच्या विरोधात नाभिक समाजाने तीव्र निदर्शने केली. (Marathwada) यावेळी दानवे यांची अर्धी कटिंग करणाऱ्यास २१ हजार रुपयांचे रोख बक्षिस देण्याची घोषणा देखील करण्यात आली.

रावसाहेब दानवे यांनी महाविकास आघाडी सरकावर टीका करतांना अनेकदा अमर अकबर एन्थाॅनीचे सरकार, पंक्चर झालेल्या तीन चाकी रिक्षाची उपमा दिली होती. काही दिवसांपुर्वी तिरूपती बालाजी मंदिरातील न्हावी जसे अर्धी कटिंग करून भाविकांना रोखून धरतात, तसेच राज्यातील महाविकास आघाडी सरकार राज्यातील जनतेला वेठीस धरत असल्याची टीका केली होती.

यावरून राज्यातील नाभिक समाज संतप्त झाला, अनेक ठिकाणी रस्त्यावर उतरून दानवे यांच्या विरोधात आंदोलन करत त्यांनी नाभिक समाजाची माफी मागावी अशी मागणी देखील केली होती. आज जालन्यातील मामा चौकात नाभिक समाजाच्या वतीने दानवे यांच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. रावसाहेब दानवेंची अर्धी कटींग करणाऱ्यांस २१ हजार रुपयांचे रोख बक्षीस देण्याची घोषणा देखील यावेळी करण्यात आली.

जालन्यातील एका कार्यक्रमात दानवे यांनी महाविकास आघाडी सरकार विरोधात टीका करताना सरकारची अवस्था तिरुपती येथील न्हाव्यांसारखी झाली असल्याचं सांगत तिरूपतीमधील न्हावी डोक्यावर दोन-दोन वस्तारे हाणून ग्राहकांना बसून ठेवत असल्याचे म्हटले होते. या विधानाच्या विरोधात मामा चौकात नाभिक समाजाच्या वतीने निदर्शने करण्यात येऊन दानवे यांच्या फोटोला जोडे मारण्यात आले.

आंदोलना दरम्यान नाभिक समाजाच्या आंदोलकांनी हातात काळ्या रंगाचे झेंडे घेऊन दानवे यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवत जोरदार घोषणाबाजी केली. नाभिक महामंडळाचे राज्याचे अध्यक्ष कल्याण दळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. दानवे यांनी नाभिक समाजाची माफी मागावी अन्यथा आंदोलन तीव्र करू, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT