मी राज्य उत्पादन शुल्क विभागाचा ग्राहक, कार्यालयाचे भुमीपूजन माझ्या हातानेच व्हायला हवे होते..

`खाब, गुलाब,जहेर,दवा बता क्या क्या है, मै आगया हू बता इंतजाम क्या क्या है? श्याम को आ रहा हू, असे म्हणत गोरंट्याल यांनी आपल्या भाषणाला पुर्णविराम दिला. (Mla Kailas Gorantyal)
Mla Kailas Gorantyal, Jalna
Mla Kailas Gorantyal, Jalna sarkarnama
Published on
Updated on

जालना : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिक्षक कार्यालयाचे भुमीपूजन नुकते राज्याचे आरोग्य मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांच्या हस्ते झाले. यावेळी काॅंग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल हे देखील उपस्थितीत होते. यावेळी भाषणाला उभे राहिलेल्या गोरंट्याल यांनी चागंलीच फटकेबाजी केली. (Jalna) शायराना अंदाजात गोरंट्याल यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाचा ग्राहक आहे, त्यामुळे अधिक्षक कार्यालयाचे भुमीपूजन माझ्याच हस्ते व्हायला हवे होते, पण आयोजकांच्या हे कसे लक्षात आले नाही? असा चिमटा गोरंट्याल (Kailas Gorantyal) यांनी काढला आणि टोपेंसह व्यासपीठावर उपस्थितीत सगळ्यांची खळखळून हसत त्यांना दाद दिली.

आमदार कैलास गोरंट्याल हे सध्या चांगलेच चर्चेत आहेत. भाजपचे खासदार तथा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याशी त्यांची वाढती जवळीक हे देखील या चर्चेमागचे एक कारण समजले जाते. रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरण कामाच्या शुभारंभ प्रसंगी गोरंट्याल यांनी लावलेली हजेरी, रावसाहेब दानवे यांचे केलेले कौतुक पाहून तिथे उपस्थीत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांनी तर गोरंट्याल यांना थेट भाजपमध्ये येण्याची आॅफरच देवून टाकली होती.

तर अशा या गोरंट्याल यांचा एक फोटो काही महिन्यांपुर्वी सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. त्यांच्याच फेसबुक पेजवरून तो चर्चेत आला, तो फोटो होता एक बीयर बारचे उद्घाटन करतांनाच. शो केसमध्ये दारूच्या बाटल्या ठेवलेल्या होत्या आणि त्यापुढे आमदार महोदय उभे होते. विशेष म्हणजे अशा व्यवसायातून बेरोजगारांना रोजगार मिळतो, असे धाडसी विधान देखील त्यांनी केले होते.

आता तर मी राज्य उत्पादन शुल्क विभागाचा ग्राहक असल्याचे जाहीरपणे सांगत त्यांनी या विभागाच्या अधिक्षक कार्यालयाच्या भुमीपूजनाचा मान आपल्यालाच मिळायला हवा होता, असा टोला लगावल्याने पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहेत. टोपे हे आरोग्य मंत्री असल्यामुळे एखाद्या रुग्णालयाचे किंवा महाविद्यालयाचे उद्धाटन त्यांच्या हस्ते होणे समजू शकतो. पण माझ्याकडे हाॅटेल आहे, मी १९८६ पासून राज्य उत्पादन शुल्कचा ग्राहक त्यामुळे या कार्यालयाच्या उद्धाटनाचा मान तरी मला मिळायला हवा होता, असा चिमटा काढला.

Mla Kailas Gorantyal, Jalna
'सोनिया गांधींना महाविकास आघाडीत सहभागी व्हायचे नव्हते, पण...'

व्यासपीठावरील बबलू चौधरी व अन्य नेत्यांकडे कटाक्ष टाकत `खाब, गुलाब,जहेर,दवा बता क्या क्या है, मै आगया हू बता इंतजाम क्या क्या है? श्याम को आ रहा हू, असे म्हणत गोरंट्याल यांनी आपल्या भाषणाला पुर्णविराम दिला. गोरंट्याल यांच्या टोलेबाजीला उपस्थितांनी भरभरू प्रतिसाद दिल्यामुळे हा भुमीपूनज सोहळा चागंलाच चर्चेत आला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com