केज : मस्साजोग (ता. केज) येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून खून केल्या प्रकरणी बीड स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने आणखी एकास रांजणगाव (पुणे) येथून बुधवारी (ता. 11) अटक केली. प्रतीक भीमराव घुले (वय 25, रा. टाकळी, ता. केज) असे त्याचे नाव आहे. यापूर्वी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
सोमवारी (ता. 9) ही घटना घडली होती. सर्व मारेकरी घटनेनंतर फरारी होते. या घटनेच्या निषेधार्थ व मारेकऱ्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी मस्साजोग व केज शहरात मंगळवारी (ता.10) दिवसभर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. (Beed News) त्यामुळे संशयितांना अटक करण्याचे पोलिस प्रशासनासमोर आव्हान होते.
दरम्यान, खून केल्यानंतर प्रतीक घुले पुण्याच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी रांजणगाव (पुणे) येथून त्याला ताब्यात घेतले. (Pune) दरम्यान, घटनेच्या दुसऱ्या दिवशी पोलिसांनी जयराम माणिक चाटे (21, रा. तांबवा ता. केज) आणि महेश सखाराम केदार (21, रा. मैंदवाडी, ता. धारूर) या संशयितांना अटक केली होती.
सरपंच देशमुख खुन प्रकरणाने बीड जिल्हा हादराला आहे. दरम्यान, या प्रकरणाची एसआयटी चौकशी करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजलगावचे आमदार आमदार प्रकाश सोळंके यांनी केली आहे. या शिवाय भाजप नेत्या आमदार पंकजा मुंडे यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचे सांगितले आहे.
माजी सरपंच संतोष देशमुख यांचा खून, परळी येथील तरूण व्यापारी अमोल डुबे यांचं अपहरण करून लूटमार या दोन्ही घटनांबरोबरच जिल्ह्यात अलिकडच्या काळात घडलेल्या घटना चिंताजनक आहेत. पोलिसांनी या दोन्ही घटनांची स्पेशल इन्व्हिस्टीगेशन टीमकडून सखोल चौकशी करावी, अशी मागणीही पंकजा मुंडे यांनी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.